Daniel Wyatt got engaged to Georgie Hodge: इंग्लंडची स्टार महिला क्रिकेटर डॅनियल व्याटने तिची दीर्घकाळाची मैत्रीण जॉर्जी हॉजला डेट केल्यानंतर एंगेजमेंट केली आहे. ३ मार्च रोजी ट्विटरवर एक रोमँटिक फोटो शेअर करून तिने याबाबत माहिती दिली. जॉर्जी हॉज ही व्यवसायाने फुटबॉल एजंट आहे. ती सीएए बेसच्या फुटबॉल महिला संघाची प्रमुख आहे. दोघी २०१९ पासून म्हणजे गेल्या ४ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होत्या. दोघेही लंडनमध्ये राहतात आणि अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
डॅनियल व्याटने टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीला प्रपोज केले होते. याशिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरसोबतचा तिचा फोटोही खूप चर्चेत आला होता. अलीकडेच ती महिला प्रीमियर लीग २०२३ (WPL 2023) लिलावात विकली गेली नाही. २०१४ मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान व्याटने “कोहली मेरी मेरी” असे ट्विट केले होते.
डॅनियल व्याटचा अर्जुन तेंडुलकरसोबतचा फोटो व्हायरल झाला होता –
जून २०२२ मध्ये अर्जुन तेंडुलकरसोबतचा डॅनियल व्याटचा फोटो व्हायरल झाला होता. दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत आणि लंच डेटवर गेले होते. डॅनियल व्याट ही इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू आहे. ती इंग्लंडमध्ये ससेक्स, सदर्न वायपर्स आणि सदर्न ब्रेव्ह्ससाठी व्यावसायिक क्रिकेट खेळते. तिने मार्च २०१० मध्ये इंग्लंडसाठी पदार्पण केले. तिने २००५ मध्ये व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून ९९ एकदिवसीय आणि ३०३ टी-२० सामने खेळले आहेत. व्याट सुपरनोव्हा आणि मेलबर्न रेनेगेड्ससाठीही खेळली आहे.
हेही वाचा – IND vs AUS 3rd Test: भारताकडून कुठे झाली चूक? दणदणीत विजयानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार स्मिथने दिले ‘हे’ उत्तर
डॅनियल व्याट डब्ल्यूपीएल लिलावात अनसोल्ड राहिली –
महिला प्रीमियर लीग 2023 (WPL 2023) पूर्वी झालेल्या लिलावात डॅनियल व्याटला खरेदीदार मिळाला नाही. त्यानंतर ती चांगलीच निराश झाली होती. तिची मूळ किंमत ५० लाख रुपये ठेवली होती. तिने ट्विट केले होते की, “डब्ल्यूपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न होते. . निवड झालेल्या सर्वांचे अभिनंदन. भारत हे क्रिकेट खेळण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.”