Pakistan should stick to its word: आशिया चषक २०२३ या स्पर्धेला ३१ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवली जाणार आहे. दरम्यान आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने हायब्रीड मॉडेलसाठी पीसीबी प्रमुख नजम सेठींवर टीका केली आहे. माजी खेळाडू म्हणाला की, जर पाकिस्तानला आपल्या भूमिकेवर ठाम राहू शकत नसेल, तर त्यांनी ही स्पर्धा संपूर्णपणे मायदेशात आयोजित केली जाईल अशी बढाई मारू नये.

दानिश कनेरिया आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, “पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा आणि नजम सेठी यांनी पाकिस्तानचा संघ भारतात जाणार नाही, असा गदारोळ मीडियासमोर केला. तुम्ही तुमची यू-टर्नची सवय कधी थांबवाल? तुमच्या शब्दांवर ठाम राहायला शिका. बोलण्यापूर्वी विचार करा, म्हणून मी सांगतो. मला खात्री आहे की स्तब्धता आणि झुकणे नेहमीच यशाकडे घेऊन जाते.”

India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’
Champions Trophy Mohammed Hafeez Big Statement About India wont travel to Pakistan Said Somehow Not Secure for India
Champions Trophy: “भारतीय संघासाठी पाकिस्तान सुरक्षित नाही…”, पाकिस्तानच्या माजी खेळाडूच्या पोस्टने उडाली खळबळ, PCBला दाखवला आरसा
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
Champions Trophy Cricket Tournament BCCI demand to organize matches in Dubai sport news
पाकिस्तानात खेळण्यास नकारच! दुबईत सामने आयोजित करण्याची ‘बीसीसीआय’ची मागणी

दानिश कनेरिया पुढे म्हणलाा, “आता पाकिस्तानला हायब्रीड मॉडेल मिळाले आहे. पाकिस्तानच्या लोकांनी शेवटी काय साध्य केले आहे. पाकिस्तान फक्त नेपाळविरुद्धच क्रिकेट खेळेल. चाहत्यांना हेच पहायचे होते का? पाकिस्ताननेही हिरवा झेंडा दाखवून ते भारतात विश्वचषक खेळणार असल्याचे सांगितले.”

हेही वाचा – Shahid Afridi on PCB: “अहमदाबादची खेळपट्टी आग ओकते की झपाटलेली…”; पाकिस्तानच्या माजी खेळाडूची पीसीबीवर सडकून टीका

माजी खेळाडू पुढे म्हणाला, “मी असे म्हणत नाही की नेपाळ हा एक कमकुवत संघ आहे. तुम्ही क्रिकेटमध्ये कोणालाही कमी लेखू शकत नाही. एखाद्या दिवशी कोणता संघ चांगले क्रिकेट खेळेल आणि मोठ्या संघांनाही पराभूत करेल हे तुम्हाला माहीत नाही.”

एसीसी पुरूष प्रीमियर चषक फायनलमध्ये यूएईचा सात गडी राखून पराभव करून नेपाळ आशिया कपसाठी पात्र ठरणारा सहावा संघ ठरला आहे. आशिया चषक २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तानसोबत नेपाळचा संघ अ गटात असेल. त्याचबरोबर ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान असतील.

हेही वाचा – Salman Butt: “बीसीसीआयने विराट कोहलीला कर्णधारपद…”; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे धक्कादायक विधान

आशिया चषक २०२३ चे यजमानपद पाकिस्तानला मिळणार होते आणि गेल्या अनेक महिन्यांपासून गदारोळ सुरू होता. कारण भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास तयार नव्हता. यामुळे, शेवटी आशिया चषक २०२३ हायब्रीड मॉडेलवर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत आता पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन्ही देश एकत्र आशिया चषकाचे आयोजन करणार आहेत. यावेळी आशिया कपमध्ये ५० षटकांचे सामने होणार आहेत. त्याची सुरुवात ३१ ऑगस्टला होईल. तसेच स्पर्धेचा अंतिम सामना १७ सप्टेंबर २०२३ रोजी खेळवला जाईल.