Danish Kaneria Criticizes Pak Prime Minister about Arshad Nadeem : स्टार भालाफेकपटू अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पाकिस्तानसाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. या ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानला एकच पदक मिळाले आणि ते पदक अर्शद नदीमने भालाफेकमध्ये जिंकले. अर्शदने ९२.९७ मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले आणि या थ्रोसह ऑलिम्पिक विक्रमही मोडला. ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक खेळात सुवर्णपदक जिंकणारा अर्शद पाकचा पहिला ॲथलीट ठरला आहे.

या अफाट यशानंतर, त्याला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भेटण्याची संधी मिळाली, ज्यांनी त्याला ३ लाख रुपये रोख बक्षीस दिले. ज्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल फोटो पाहिल्यानंतर माजी पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरिया पंतप्रधानांवर चांगलाच संतापला आहे. यानंतर त्याने पंतप्रधानांना अर्शदसोबत पोस्ट केलेला फोटो हटवण्यास सांगितले, ज्यात ते अर्शद नदीमला रोख बक्षीस देताना दिसत आहेत.

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Shashi Tharoor on Nitesh Rane
नितेश राणेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून शशी थरूर यांचा संताप; म्हणाले, “या लोकांना…”
Mahavikas Aghadi News
MVA : काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर, “लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या..”
Sarangi Mahajan Serious Allegations on Dhananjay and Pankaja Munde
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप, “धनंजय आणि पंकजाने माझी साडेतीन कोटींची जमीन हडप केली, वाल्मिक कराड…”

दानिश कनेरिया पाकिस्तानच्या पंतप्रधानावर संतापला –

पाकिस्तानचे माजी क्रिकेटर दानिश कनेरियाने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या एक्सवर ट्वीट केले आणि लिहिले, ‘माननीय पंतप्रधान, कृपया किमान विनम्र अभिनंदन करा. तुम्ही दिलेला लाखो रुपयांचा फोटो डिलीट करा. ही रक्कम अर्शदच्या गरजांसमोर काहीच नाही. ही रक्कम इतकी कमी आहे की त्याला विमानाचे तिकीटही काढू शकत नाही. त्यामुळे अर्शदच्या सततच्या संघर्षाचा विचार करता हा त्याचा आणि देशाचा अपमान आहे.’

हेही वाचा – Keshav Maharaj : केशव महाराजने केला मोठा पराक्रम, कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील दुसरा गोलंदाज

अर्शद नदीम पाकिस्तानी पत्रकारांना काय म्हणाला?

अर्शद नदीम पाकिस्तानी पत्रकारांना म्हणाला, ‘माझ्या गावाला रस्त्यांची गरज आहे. जर सरकारने स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध करून दिला तर ते माझ्यासाठी आणि माझ्या गावासाठी खूप चांगले होईल. मियां चन्नू शहरात विद्यापीठ व्हावे हे माझे स्वप्न आहे. जेणेकरून आमच्या बहिणींना शिकण्यासाठी मुलतानला जावे लागू नये, जे दीड ते दोन तासांच्या अंतरावर आहे. सरकारने येथे विद्यापीठ बांधले तर माझ्या गावासाठी आणि शेजाऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी असेल.’

हेही वाचा – Vinesh Phogat: विनेश फोगटला रौप्यपदक मिळणार? कुस्तीच्या नियमातील ‘ही’ त्रुटी विनेशच्या प्रकरणाला देणार वळण

अर्शद नदीमचे जंगी स्वागत –

पाकिस्तानचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीमचे मायदेशी परतल्यावर चाहत्यांनी जोरदार स्वागत केले आणि आपल्या कुटुंबाला भेटताना तो भावूक झाला. नदीम मायदेशी पोहोचल्यावर ‘वॉटर कॅनन सॅल्यूट’ने त्याचे स्वागत करण्यात आले. हजारो चाहते नदीमची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते आणि त्याच्या नावाचा जयघोष करत होते. नदीमने पॅरिस ऑलिम्पिक भालाफेक स्पर्धेत ९२.९७ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले होते. इथे पोहोचल्यावर नदीमने आई, वडील आणि मोठ्या भावाला मिठी मारली. अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लाउंजमध्ये भावनिक भेटीनंतर त्याच स्वागत केले.

Story img Loader