Danish Kaneria slams Mohammad Rizwan: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. तेव्हा पासून पाकिस्तान संघ सर्वांच्या निशाण्यावर आहे. भारत किंवा जगातील इतर देशांतील दिग्गजच नव्हे, तर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटूही पाकिस्तान संघाबव प्रतिक्रिया देत आहेत. शोएब अख्तर, वकार युनूस, रमीझ राजा यांच्यानंतर आता दानिश कनेरियाची एक पोस्ट व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी १५ ऑक्टोबर रोजी दानिशने अनेक ट्विट केले. जिथे त्याने संपूर्ण पाकिस्तानी संघाला बोलण्यावर कमी आणि खेळण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने मोहम्मद रिझवानने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर गाझामधील लोकांसाठी केलेल्या पोस्टवर निशाणा साधला. त्याचबरोबर एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.

मोहम्मद रिझवानने काय केली होती पोस्ट?

पाकिस्तानने दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता. या सामन्यात शतक झळकावत रिझवान विजयाचा हिरो ठरला होता. त्यानंतर मोहम्मद रिजवानची सोशल मीडियावर एक पोस्ट केली होता. ज्यामध्ये विजयानंतर रिझवानने इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाबाबत लिहिले होते की, “हा विजय गाझामधील आमच्या बंधू-भगिनींसाठी होता. विजयात योगदान दिल्याबद्दल आनंद झाला. हे सोपे बनवण्याचे श्रेय संपूर्ण टीमला आणि विशेषत: अब्दुल्ला शफीक आणि हसन अलीला जाते. हैदराबादच्या लोकांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचा आभारी आहे.” या पोस्टनंतर रिझवानला चांगलेच ट्रोल करण्यात आले.

हेही वाचा – ENG vs AFG, World Cup 2023: सॅम करन कॅमेरामॅनवर संतापला, धक्काबुक्की करतानाचा VIDEO होतोय व्हायरल

दानिश कनेरियाने मोहम्मद रिझवानला दिले सडेतोड उत्तर –

यावर आता दानिश कनेरियाने मोहम्मद रिझवानचा खरपूस समाचार घेत त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. एक्सवर पोस्ट करत दानिशने लिहिले, “पुढच्या वेळी आपला विजय मानवतेला समर्पित करा. देव कधीही क्रूरतेचे समर्थन करत नाही.” खरं तर, इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान, रिझवानचे अशी पोस्ट करणे त्याच्या सहकाऱ्यांना योग्य वाटले नाही. या पोस्टमुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले. आता भारताविरुद्धच्या पराभवानंतर त्याच्याच संघाचे माजी खेळाडू त्याला सल्ला देत आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Danish kaneria replied to mohammad rizwan saying next time dedicate your victory to humanity in world cup 2023 vbm