माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची शनिवारी पाकिस्तानच्या पुरुष राष्ट्रीय संघाचा, हंगामी मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली. आफ्रिदी माजी खेळाडू अब्दुल रझाक, राव इफ्तिखार अहमद आणि हारून रशीद यांचा समावेश असलेल्या निवडकर्त्यांच्या अंतरिम समितीचा अध्यक्ष असणार आहे. दानिश दानिश कनेरियाने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आफ्रिदी पाकिस्तानी संघाचा मुख्य निवडकर्ता झाल्यामुळे, पाकिस्तानी क्रिकेटमधील एक मोठा वर्ग खूश आहे. त्याबरोबर काही लोकांचा गट यामुळे नाखूश देखील आहे. ज्यामध्ये माजी खेळाडू दानिश कनेरियाचा समावेश आहे. दानिश कनेरियाने आफ्रिदीला एक टोमणा मारला आहे. माजी फिरकी गोलंदाजाने एक ट्विट केले आहे, जे खूप व्हायरल होत आहे.

वास्तविक, कनेरियाने आफ्रिदीचा एक फोटो शेअर केला आहे आणि हसण्याचा इमोजीही शेअर केला आहे. आफ्रिदीचा दानिश कनेरियाने शेअर केलेला फोटो, ज्यामध्ये आफ्रिदी चेंडूशी छेडछाड करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत कनेरियाने ‘चीफ सिलेक्टर’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. यासोबतच कनेरियाने हास्याचे इमोजीही शेअर केले आहेत. पाकिस्तानच्या माजी फिरकीपटूचे हे ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.

दानिश कनेरियाच्या या कृत्याने काही पाकिस्तानी चाहते संतप्त झाले आहेत. ज्यामुळे ते दानिशला त्याच्या फिक्सिंगची आठवण करून देऊ लागले आहेत. २००९ इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिप प्रो-लीग सामन्यांमध्ये स्पॉट-फिक्सिंगसाठी २०१२ मध्ये ईसीबीने त्याच्यावर बंदी घातली होती. ६ वर्षांनंतर कनेरियारने स्पॉट-फिक्सिंगचा मुद्दा २०१८ मध्ये स्वीकारला.

हेही वाचा – Meenal Gavaskar Passes Away: सुनील गावसकरांच्या आईंचे निधन, ९५व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास

कनेरिया आणि आफ्रिदीचे संबंध खेळण्याच्या दिवसांपासून चांगले नव्हते. कनेरियाने अनेकवेळा आफ्रिदीला टोमणे मारून म्हटले आहे की, त्याच्यामुळे करिअर फार काळ टिकू शकले नाही, यामागे शाहिद आफ्रिदीचा हात आहे. कनेरियाने आफ्रिदीवर आपलं करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोपही केला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Danish kaneria shared an old photo of shahid afridis ball tampering and made fun of him vbm