Cheerleaders Facts In IPL : आयपीएलच्या पहिल्या सीजनला २००८ मध्ये सुरुवात झाली होती. आयपीएल जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे आणि या लीगचा इतिहासही रोमांचक आहे. परंतु, आयपीएलमध्ये अशा काही घटना घडल्या आहेत, ज्यामुळं संपूर्ण क्रिडाविश्वात एकच खळबळ उडाली होती. फक्त खेळाडूच नाही, तर दिग्गज समालोचकही त्यांच्या कृत्यांमुळे प्रकाशझोतात आले आहेत. २००८ च्या आयपीएलच्या सीजनमध्ये एका समालोचकाने चीअरलीडरसोबत केलेल्या कृत्यामुळं त्याच्यावर सडकून टीका करण्यात आली होती. आम्ही तुम्हाला याच घटनेबद्दल माहिती सांगणार आहोत.
समालोचकाने चीअरलीडरसोबत काय केलं?
कॉमेंटेटर्सच्या दुनियेत न्यूझीलंडच्या डॅनी मॉरिसन यांचं खूप मोठं नाव आहे. पण मॉरिसनने चीअरलीडरसोबत केलेल्या त्या कृत्यामुळं क्रिडाविश्वातून चौफेर टीका करण्यात आली होती. आयपीएलच्या पहिल्या सीजनचा पिच रिपोर्ट देण्यासाठी न्यूझीलंडचे माजी क्रिकेटर मॉरिसन नेहमीच कॉमेडी करत असतात. पण त्यावेळी मॉरिसने चीअरलीडरला थेट खांद्यावर उचलून घेऊन पिच रिपोर्ट दिला होता. त्यामुळं आयपीएलच्या पहिल्याच सीजनमध्ये एकच खळबळ उडाली होती. मॉरिसनवर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली होती.
डॅनी मॉरिसनचं क्रिकेट करिअर
डॅनी मॉरिसन न्यूझीलंडचे वेगवाग गोलंदाज राहिले आहेत. मॉरिसनने त्यांचा पहिला कसोटी सामना १९८७ मध्ये खेळला होता आणि पहिला एकदिवसीय सामना भारताविरुद्ध १९८७ मध्ये खेळला होता. मॉरिसनचा क्रिकेट करिअर जबरदस्त राहिला आहे. मॉरिसनने एकूण ४८ कसोटी सामने खेळले असून १६० विकेट घेण्यात यशस्वी ठरला. तर ९६ एकदिवसीय सामन्यात १२६ विकेट घेतले होते. १९९४ मध्ये भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात मॉरिसन हॅट्रिक घेणारा न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज ठरला होता. त्याने कपिल देव,सलिल अंकोला आणि नयन मोंगियाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.