मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील अखेरच्या दोनशेव्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद व्हावे अशी आमची इच्छा असल्याचे प्रतिस्पर्धी वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमी याने म्हटले आहे.
फोटो गॅलरी: मैदानाबाहेरचा सचिन..
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सचिनचा दोनशेवा कसोटी सामना रंगणार आहे. या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ भारतात दाखल झाला आहे. यावेळी सॅमी म्हणाला, “दोन वर्षांपूर्वी आम्ही सचिनला याच मैदानावर ९४ धावांवर बाद करून त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शंभराव्या शतकापासून रोखले होते. याचप्रमाणे आताही आम्ही त्याच्या अखेरच्या दोनशेव्या कसोटी सामन्यात त्याला शून्यावर बाद करण्याचे आमचे लक्ष्य आहे.”
फ्लॅशबॅक : सचिन रमेश तेंडुलकर
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या दोन कसोटी सामन्यांतील पहिला सामना कोलकातामध्ये ६ ते १० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. तर मुंबईतील सामन्याला १४ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा