David miller breaks faf du plessis record in world cup knock out: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ डेव्हिड मिलरसाठी फारसा चांगला गेला नाही. त्याने आपल्या संघासाठी खेळलेल्या ९ साखळी सामन्यांमध्ये निराशा केली. या ९ साखळी सामन्यांमध्ये त्याने फक्त एकदाच अर्धशतक झळकावले होते. त्याने पुण्यात न्यूझीलंडविरुद्ध ५३ धावांची इनिंग खेळली, पण उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात त्याने शतक झळकावले. त्याचबरोबर डेव्हिड मिलरने आपल्या संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तो विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेसाठी शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
डेव्हिड मिलरने आपल्या खेळीत ११६ चेंडूचा सामना करताना ८ चौकार आणि ५ षटकार लगावत १०१ धावा केल्या. त्याच्याशिवाय दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक ४७ धावांची खेळी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाला २०० धावांचा टप्पा पार करता आला. दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ४९.४ षटकांत सर्वबाद २१२ धावा केल्या.
या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याचा निर्णय योग्य ठरला नाही आणि एका क्षणी संघाने २४ धावांवर ४ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर पाचव्या विकेटसाठी डेव्हिड मिलरने हेनरिक क्लासेनसोबत ९५ धावांची भागीदारी केली, मात्र ११९ धावांवर क्लासेन ४७ धावा करून बाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेची ही पाचवी विकेट ठरली. यानंतर लगेचच ११९ धावांवर संघाची सहावी विकेट पडली आणि यान्सेन शून्यावर बाद झाला, पण मिलरने खंबीरपणे उभे राहून कांगारू गोलंदाजांचा चांगला सामना केला.
हेही वाचा – World Cup 2023: फायनलमध्ये राहुल द्रविड टीम इंडियाला शेवटचे कोचिंग करताना दिसणार? मोठी अपडेट आली समोर
दक्षिण आफ्रिकेसाठी बाद फेरीत शतक झळकावणारा डेव्हिड मिलर पहिला खेळाडू –
डेव्हिड मिलनरने या सामन्यात कांगारू संघाविरुद्ध संयमाने फलंदाजी करत ११५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे या विश्वचषकातील पहिले शतक होते तर एकदिवसीय विश्वचषकातील त्याचे दुसरे शतक होते. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याने २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पहिले शतक झळकावले होते. या सामन्यात त्याने ११६ चेंडूंचा सामना करताना ५ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने १०१ धावा केल्या. या दरम्यान डेव्हिड मिलर दक्षिण आफ्रिकेसाठी बाद फेरीत शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
डेव्हिड मिलरने ८ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषकात आपले दुसरे शतक झळकावण्यात यश मिळवले, तर त्याचे एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील हे सहावे शतक होते. ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध मिलरचे वनडे कारकिर्दीतील हे तिसरे शतक होते. मिलर आता आयसीसी बाद फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाछी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने फाफ डू प्लेसिसचा (८२ धावा) विक्रमही मोडला.