दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग केल्याप्रकरणी, ऑस्ट्रेलियाचा उप-कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आपली चूक मान्य करत चाहत्यांची माफी मागितली आहे. डेव्हिड वॉर्नरला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका वर्षाच्या बंदीची शिक्षा सुनावली आहे. वॉर्नरसोबत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि कॅमरुन बँकरॉफ्ट यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अवश्य वाचा – वॉर्नरकडून चूक झाली पण तो वाईट माणूस नाही – केन विलियमसन

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेल्या कारवाईसोबत, आयपीएलमध्येही डेव्हिड वॉर्नरला आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. याचसोबत वॉर्नच्या मुख्य प्रायोजकत्वांनीही त्याच्यापासून फारकत घेतली आहे. स्टिव्ह स्मिथ आणि कॅमरुन बँकरॉफ्ट यांच्यासोबत मायदेशी परतल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन घडलेल्या प्रकारात आपली चूक मान्य करत माफीनामा प्रसिद्ध केला आहे.

दरम्यान डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदी भारतीय संघातील खेळाडू शिखर धवन याची निवड होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर असं झालं तर आपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व संघ भारतीय खेळाडूंच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरतील. त्यामुळे वॉर्नरच्या हातून निसटलेला डाव सावरण्यासाठी आता नेमकी कोणाच्या नावाला पसंती मिळणार याकडेच संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

अवश्य वाचा – Ball Tampering : स्टीव्ह स्मिथ व वॉर्नरवर एक वर्षाची बंदी, IPL मधूनही गच्छन्ती