David Warner breaks Sachin Tendulkar’s record: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची खेळी खेळली आणि शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील २० वे शतक होते, तर वॉर्नरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या फॉरमॅटमध्ये पाचवे शतक झळकावले. पहिल्या सामन्यात वॉर्नर शून्यावर बाद झाला होता, मात्र या सामन्यात त्याने मागील कामगिरीला मागे टाकत शानदार फलंदाजी केली. त्याचबरोबर त्याने सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डेव्हिड वॉर्नरने ८५ चेंडूत झळकावले शतक –

डेव्हिड वॉर्नरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ८५ चेंडूत शतक झळकावले आणि हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील २० वे शतक ठरले. या खेळीदरम्यान त्याने ३ षटकार आणि १२ चौकारांसह आपले शतकही पूर्ण केले. अलीकडेच खराब फॉर्ममध्ये असलेला वॉर्नर विश्वचषकापूर्वी फॉर्ममध्ये परतणे कांगारू संघासाठी चांगले संकेत आहे. वॉर्नर ३६ वर्षांचा असल्यामुळे तो कदाचित शेवटचा एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळेल. या सामन्यात वॉर्नरने ९३ चेंडूत १०६ धावा केल्या.

डेव्हिड वॉर्नरने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम –

डेव्हिड वॉर्नरने सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४६ वे शतक ठोकले आणि सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. सचिनने सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५ शतके झळकावली होती, तर ख्रिस गेल ४२ शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – IND vs PAK सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याचे मोठं वक्तव्य; म्हणाला, “मला इतर खेळाडूंपेक्षा दुप्पट…”

सलामीवीरांनी झळकावलेली सर्वाधिक शतके –

४६ – डेव्हिड वॉर्नर<br>४५ – सचिन तेंडुलकर
४२ – ख्रिस गेल
४१- सनथ जयसूर्या
४०- मॅथ्यू हेडन
३९ – रोहित शर्मा<br>३७ – स्टीव्ह स्मिथ

वॉर्नरने सलामीवीर म्हणून पूर्ण केल्या ६००० धावा –

या खेळीदरम्यान डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ६००० धावा पूर्ण केल्या. त्याने हा पराक्रम १४० मध्ये केला, तर पहिल्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे, ज्याने १२१ डावांमध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून ६००० धावा पूर्ण केल्या होत्या आणि तो पहिल्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वात जलद ६००० धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नर धवनसोबत चौथ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – IND vs PAK : “ही तर फक्त सुरुवात आहे, अजून…”; सुपर-4 सामन्यापूर्वी टीम इंडियाला शाहीन आफ्रिदीने दिला इशारा

सलामीवीर म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ६००० धावा पूर्ण करणारे फलंदाज –

१२१ डाव – रोहित शर्मा
१२३ डाव – हाशिम आमला
१३३ डाव – सचिन तेंडुलकर
१४० डाव – डेव्हिड वॉर्नर
१४० डाव – शिखर धवन
१४३ डाव – सौरव गांगुली

हेही वाचा – SL vs BAN: श्रीलंकेने बांगलादेशसमोर ठेवले २५८ धावांचे लक्ष्य, सदिरा समरविक्रमाने खेळली ९३ धावांची खेळी

वॉर्नर आणि हेडची शतकी भागीदारी –

या सामन्यात वॉर्नरने ट्रॅव्हिस हेडसह पहिल्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर इतिहास रचला. वास्तविक, या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने पॉवरप्लेमध्ये म्हणजेच पहिल्या १० षटकांत १०२ धावा केल्या होत्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय सामन्यात पॉवरप्लेमध्ये १०० धावा करणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ ठरला. या सामन्यात हेडने आपल्या संघासाठी ३६ चेंडूत ३ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ६४ धावांची खेळी केली आणि या कालावधीत त्याचा स्ट्राईक रेट १७७.७८ होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: David warner breaks sachin tendulkars record for most odi centuries as an opener in sa vs aus 2nd odi vbm