David Warner Criticized Air India: आयपीएल २०२५ला सुरूवात झाली असून या हंगामात स्फोटक फलंदाड डेव्हिड वॉर्नर खेळाताना दिसणार नाही. असे असले तरी वॉर्नर सध्या चांगलाच चर्चेत आहे. मात्र याचा क्रिकेटशी काही संबंध नाही. ३८ वर्षीय फलंदाज वॉर्नरने त्याला विमान प्रवासात सहन कराव्या मनस्तापाबद्दल एअर इंडियाबद्दल संताप व्यक्त केला आहे. वॉर्नर पायलटच नसलेल्या विमानात चढला, त्यामुळे त्याला बराच वेळ वाट पाहावी लागली. यानंतर त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.

वॉर्नरने लिहिले, “एअर इंडिया आम्ही एका विमानात बसलो आहोत ज्यामध्ये वैमानिक नाहीत आणि कित्येक तास विमानात वाट पाहत आहोत. तुमच्याकडे वैमानिक नाहीत हे माहीत असूनही तुम्ही प्रवाशांना विमानात का बसवाता?”

एअर इंडियाने एक निवेदन जारी करून बंगळुरूमधील खराब हवामानामुळे विमान उड्डाणाला उशीर झाल्याचे म्हटले आहे. या खराब हमावानामुळे अनेक विमान कंपन्यांना मोठ्या प्रमाणात विमाने इतरत्र वळवावी लागली आणि विमान उड्डाणाला उशिर झाला असे विमान कंपनीने म्हटले आहे. एअरलाइनने स्पष्ट केले की डेव्हिड वॉर्नर ज्या विमानता बसला होता, त्यासाठी नियुक्त केलेले कर्मचारी दुसऱ्या कामात व्यस्त होते. ज्यामुळे उड्डण आणखी जास्त काळासाठी रखडले. एअर इंडियाने तक्रार मान्य केली आणि वॉर्नर आणि इतर प्रवाशांना झालेल्या उशिराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

डेव्हिड वॉर्नर पीएसएलमध्ये खेळणार

ऑस्ट्रिलियाचा दिग्गज खेळाडू सध्या भारतात सुरू असलेल्या इंडियन प्रीमीअर लीग २०२५ मध्ये खेळताना दिसनार नाहीये. वॉर्नरवर गेल्या वर्षी जेधाह येथे झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये कोणीही बोली लावली नव्हती. आयपीएलच्या इतिहासात ६ हजार किंवा त्याही पेक्षा जास्त धावा काढणाऱ्या चार फलंदाजांमध्ये वॉर्नरचे नाव आहे. या यादीत विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांचा देखील समावेश आहे.

डेव्हिड वॉर्नर हा ११ एप्रिल ते १८ मे दरम्यान होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२५ मध्ये कराची किंग्जकडून खेळणार आहे. हा संघ त्यांचा पहिला सामना मुल्तान सुल्तान्स यांच्याबरोबर कराची येथे शनिवारी म्हणजेच १२ एप्रिल रोजी नॅशनल स्टेडीअमवर खेळला जाईल.