धडाकेबाज फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आता हिंसक मारहाणीत अडकला आहे. काही दिवसांपूर्वीच पत्रकारांवर अश्लाघ्य भाषेत टीका करणाऱ्या वॉर्नरने आता चक्क एका खेळाडूला मारहाण केली आहे. इंग्लंडविरुद्धचा सामना गमावल्यानंतर वॉर्नरची स्वारी बर्मिगहॅममधील बारमध्ये अवतरली. तिथे विनाकारण त्याने इंग्लंडचा खेळाडू जो रुटला मारहाण केली. वॉर्नरचे हे उन्मत वर्तन त्याला भोवण्याची चिन्हे आहेत. या बेताल वागणुकीमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी वॉर्नरला न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीतून वगळण्यात आले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाची याप्रकरणी चौकशी सुरू असून, वॉर्नरवर आणखी सक्त कारवाई होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात इंग्लंड एण्ड वेल्स क्रिकेट बोर्डानेही निवेदन जारी केले आहे, मात्र यात रुटच्या नावाचा उल्लेख नाही. मात्र वॉर्नरने केलेले कृत्य अकारण असल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. दरम्यान वॉर्नरने आपली चूक मान्य केली आहे आणि संबंधित खेळाडूची त्याने माफीही मागितली आहे. याप्रकरणी तपास प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या प्रकारासाठी कोणत्याही पद्धतीने इंग्लंडचा खेळाडू जबाबदार नसल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे.
डेव्हिड वॉर्नरवर शिस्तभंगाची कारवाई
धडाकेबाज फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आता हिंसक मारहाणीत अडकला आहे. काही दिवसांपूर्वीच पत्रकारांवर अश्लाघ्य भाषेत टीका करणाऱ्या वॉर्नरने आता चक्क एका खेळाडूला मारहाण केली आहे. इंग्लंडविरुद्धचा सामना गमावल्यानंतर वॉर्नरची स्वारी बर्मिगहॅममधील बारमध्ये अवतरली. तिथे विनाकारण त्याने इंग्लंडचा खेळाडू जो रुटला मारहाण केली.
First published on: 13-06-2013 at 04:07 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: David warner dropped over alleged altercation with england player