न्यूझीलंड विरुद्धचा सामना डेव्हिड वॉर्नरला मुकावा लागणार
ऑस्ट्रेलिया संघाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरला चॅम्पियन्स करंडक मालिकेतील न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्याला मुकावे लागणार आहे. बर्मिंघम बार मध्ये नशेत धुंद झालेल्या डेव्हिड वॉनरने इंग्लंडचा खेळाडू ज्यो रूट याच्याशी वाद घातला आणि भांडण अगदी हाणामारीपर्यंत पोहोचले. चॅम्पियन्स करंडक मालिकेत इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी पराभव झाला होता. त्यावरून या दोघांमध्ये बर्मिंघम बारमध्ये बाचाबाची झाली. यावर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डेव्हिड वॉर्नरला न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्यास सांगितले गेले आहे. कारण, डेव्हिडने आचारसंहिता नियमाचे उल्लंघन केले आहे.
डेव्हिड वॉर्नरला नियम सहा ‘अशोभनिय वागणुकी’ अंतर्गत दोषी ठरविण्यात आले आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा