सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने झळकावलेल्या नाबाद त्रिशतकी खेळाच्या जोरावर, ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध अ‍ॅडलेड कसोटी सामन्यात धावांचा डोंगर उभा केला आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ५८९ धावांवर आपला डाव घोषित केला. वॉर्नरने ४१८ चेंडूत ३३५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ३९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या खेळीदरम्यान वॉर्नरने माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू डॉन ब्रॅडमन यांचा विक्रमही मोडला.

अवश्य वाचा – स्टिव्ह स्मिथ चमकला, ७३ वर्ष जुना विक्रमही मोडला

IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम
Travis Head Injury Update Suffers Groin Injury in Gabba Test
IND vs AUS: ट्रॅव्हिस हेड मेलबर्न कसोटीत खेळणार नाही? गाबा कसोटीत झाली होती दुखापत, स्वत: दिले अपडेट
Jasprit Bumrah Breaks Kapil Dev Record and Becomes Most Wicket Taker in Australia for India IND vs AUS Gabba
IND vs AUS: जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियामध्ये घडवला इतिहास, कपिल देवला मागे टाकत ठरला नंबर वन
India vs Australia 3rd Test Cricket Match KL Rahul statement on batting sports news
पहिली ३० षटके गोलंदाजांची, मग फलंदाजी सोपी- राहुल
Steve Smith Stunning Slip Catch to Dismissed KL Rahul After Dropping Catch on First ball of the Game
IND vs AUS: स्लिपमधील उत्कृष्ट कॅच? स्मिथने डाईव्ह करून गुडघ्यावर पडत टिपला जबरदस्त झेल, राहुल असा झाला बाद; पाहा VIDEO
Sunil Gavaskar says Virat Kohli should take inspiration from Sachin Tendulkar sports news
कोहलीने सचिनकडून प्रेरणा घ्यावी -गावस्कर

कसोटी क्रिकेटमधलं वॉर्नरचं हे पहिलं त्रिशतक ठरलं. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून त्रिशतक झळकावणारा वॉर्नर चौथा खेळाडू ठरला आहे. याचसोबत अ‍ॅडलेड ओव्हलच्या मैदानावर सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही आता वॉर्नरच्या नावे जमा झाला आहे. याआधी २९ जानेवारी १९३२ रोजी ब्रॅडमन यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अ‍ॅडलेडच्या मैदानावर नाबाद २९९ धावांची खेळी केली होती. वॉर्नरने आज त्रिशतक झळकावत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

डेव्हिड वॉर्नरने लॅबुसचेंजसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३६१, स्टिव्ह स्मिथसोबत १२१ तर मॅथ्यू वेडसोबत ९९ धावांची भागीदारी केली. या खेळीमुळे दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. पाकिस्तानचे सर्व गोलंदाज वॉर्नरसमोर अपयशी ठरले. शाहीन आफ्रिदीने ३ फलंदाजांना माघारी धाडलं, त्याचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला यश मिळालं नाही.

अवश्य वाचा – पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत डेव्हिड वॉर्नरचं त्रिशतक

Story img Loader