दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग प्रकरणी दोषी आढळलेल्या, ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरच्या बचावासाठी आता न्यूझीलँडचा कर्णधार केन विलियमसन समोर आला आहे. आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या केन विलियमसनने, वॉर्नर हा वाईट माणूस नसल्याचं म्हटलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉल टॅम्परिंग प्रकरणात स्टिव्ह स्मिथसह डेव्हिड वॉर्नला एका वर्षाच्या बंदीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणानंतर वॉर्नरला त्याच्या मुख्य प्रायोजकत्वांनी रामराम केला आहे.

अवश्य वाचा – क्रिकेट सभ्य माणसांचा खेळ, स्मिथ व वॉर्नरवरील बंदीचा निर्णय योग्यच: सचिन तेंडुलकर

इंग्लंडविरुद्ध ख्राईस्टचर्च येथे खेळवण्यात येणाऱ्या कसोटी सामन्याआधी विलियमसनने पत्रकारांशी संवाद साधला. “गेल्या काही दिवसांमध्ये ज्या काही घटना समोर आल्या आहेत, त्या पाहता खेळाडूंना येत्या काळात कठीण काळाला तोंड द्यावं लागणार आहे. येत्या काळात हे प्रकरण कदाचीत शांत होईल. पण माझ्या मते डेव्हिड वॉर्नर वाईट माणून नाहीये. त्याच्याकडून चुक झाली आहे याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. मात्र तो वाईट माणूस नाही एवढं मी खात्रीने सांगू शकतो.”

अवश्य वाचा – क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठा झटका; टॉप स्पॉन्सर मॅगेलनने तोडली भागिदारी

प्रत्येक संघ मैदानात केलेल्या चुकांमधून धडे घेत असतो. ऑस्ट्रेलियाचा संघही या प्रकरणातून धडा घेऊन पुढच्या सामन्यांवर आपलं लक्ष केंद्रीत करेल. मात्र स्मिथ आणि वॉर्नर यांच्यासारख्या प्रतिभावान खेळाडूंच्या हातातून अशा प्रकारची चूक होणं ही नक्कीच शरमेची बाब असल्याचं विलियमसन म्हणाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉल टॅम्परिंग प्रकरणात तीन खेळाडूंना शिक्षा सुनावली असून प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांना आश्चर्यकारकरित्या क्लीन चीट दिली आहे.

अवश्य वाचा – Ball Tampering : आणखी एक विकेट, डेव्हिड वॉर्नरचा सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदाचा राजीनामा

Story img Loader