टी २० स्पर्धेत १० हजार धावा करण्याऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर याचा समावेश झाला आहे. चेन्नई विरोधात अर्धशतक झळकावत त्याने १० हजार धावांचा पल्ला गाठला आहे.
टी २० सामन्यात चार खेळाडुंनी आतापर्यंत १० हजारांचा पल्ला गाठला आहे. यात वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल आघाडीवर आहे. त्याने १३,८३९ धावा केल्या आहेत. त्याच्या खेळीत २२ शतकं आणि ८६ अर्धशतकांचा समावेश आहे. तर कायरन पोलार्ड या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने १०,९६४ धावा केल्या आहेत. तर पाकिस्तानचा शोएब मलिक या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने १०, ४८८ धावा केला आहेत. तर डेविड वॉर्नर चौथा खेळाडू आहे. त्याने १० हजार धावांचा पल्ला गाठला आहे.
Most runs in T20 cricket
1⃣ Chris Gayle – 13,839 runs
2⃣ Kieron Pollard – 10,964 runs
3⃣ Shoaib Malik – 10,488 runs
4⃣ David Warner – 10,000* runs #IPL2021 #CSKvsSRH pic.twitter.com/wkTqTLWaG4— Wisden India (@WisdenIndia) April 28, 2021
आयपीएलमध्ये सर्वाधिक ५० अर्धशतकं झळकावण्याचा मानही वॉर्नरला मिळाला आहे. शिखर धवन ४३ अर्धशतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. वॉर्नर आयपीएलमध्ये शतकंही ठोकली आहेत. वॉर्नरने आयपीएल कारकिर्दीत १४८ सामन्यात ४२ च्या सरासरीने ५,४४७ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आयपीएलमध्ये त्याच्या नावावर २०० षटकार झाले आहेत. आतापर्यंत ८ खेळाडूंनी आयपीएलमध्ये २०० षटकार मारण्याचा किमया साधली आहे.