एकामागोमाग एक मालिका खेळल्यामुळे मानसिक थकवा येतो. हा थकवा बाजूला सारून कसोटी क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करता यावे यासाठी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आयपीएल क्रिकेट लीगला अलविदा करण्याचे संकेत दिले आहेत.
‘‘कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या सर्व प्रकारांत ऑस्ट्रेलियासाठी मी सलामीवीराच्या भूमिकेत आहे. कसोटी क्रिकेट हेच माझे अंतिम उद्दिष्ट राहील. ट्वेन्टी-२० द्वारे मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, मात्र आंतरराष्ट्रीय वेळापत्रकाचे भरगच्च स्वरूप लक्षात घेता मला एका प्रकाराला प्राधान्य देणे आवश्यक आहे. कसोटी क्रिकेट माझ्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. यंदा मी आयपीएल स्पर्धेत खेळणार आहे. मात्र भविष्यात आयपीएलसारख्या स्पर्धेला मी कितपत वेळ देऊ शकेन याबाबत साशंक आहे,’’ असे वॉर्नर म्हणाला.
वॉर्नर पुढे म्हणाला की, ‘‘आयपीएलच्या सहा आठवडय़ांच्या कालावधीत मी विश्रांती घेऊन नव्या दमाने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज होऊ शकतो. कारकिर्दीतील पुढील पाच वर्षे माझ्यासाठी महत्त्वाची आहेत.’’
कसोटीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वॉर्नरचा आयपीएलला अलविदा?
एकामागोमाग एक मालिका खेळल्यामुळे मानसिक थकवा येतो. हा थकवा बाजूला सारून कसोटी क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करता यावे
First published on: 07-01-2015 at 12:08 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: David warner may stop playing in ipl to focus more on tests