ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपूट डेव्हिड वॉर्नर याचं भारतप्रेम तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण बॉलिवूडच्या गाण्यांचंही त्याला वेड आहे याची कोणालाही कल्पना नव्हती. याचं कारण म्हणजे नुकताच त्याचा बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओत त्याने लेकीसोबत डान्स केला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने एक झकास व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओत त्याची मुलगी, त्याचं छोटं बाळ, तो स्वत: आणि वॉर्नरची पत्नी कँडी असे सारेच जण डान्स करताना दिसले. त्यानंतर आता डेव्हिड वॉर्नरने एक भन्नाट फोटो पोस्ट केला आहे.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवर डेव्हिड वॉर्नरने टिकटॉकवर आल्यापासून रोज नवनवीन व्हिडीओ अपलोड करत आहे. वॉर्नरने नुकताच टिकटॉक व्हिडीओवर एक टाईमपास व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यानंतर एक फोटो स्टोरीवर पोस्ट केला. महत्त्वाचे म्हणजे त्या फोटोत संघाचा गणवेश त्याच्या पत्नीने घातला असून त्याने पत्नीचा स्विमसुट घातला आहे. यामागचं कारण त्याने सांगितलं नाहीये. केवळ टाइमपास म्हणून त्याने हा फोटो पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

ISO Monday’s #flicktheswitch @candywarner1

A post shared by David Warner (@davidwarner31) on

या आधी वॉर्नरने ‘शीला की जवानी’ या गाण्यावर डान्स करून टिक टॉकवर पदार्पण केले होते. ‘शीला की जवानी’नंतर पुन्हा डेव्हिड वॉर्नरचा सहकुटुंब, सहपरिवार डान्स व्हिडीओ फॅन्सच्या पसंतीस उतरला. वॉर्नरने एक झकास व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओत त्याची मुलगी, त्याचं छोटं बाळ, तो स्वत: आणि वॉर्नरची पत्नी कँडी असे सारेच जण डान्स करताना दिसले. डेव्हिड वॉर्नरने काही दिवसांपूर्वीच टिकटॉक अकाऊंट सुरु केलं होतं. आपले व्हिडीओ सध्या तो तिथे पोस्ट करतो आहे. तेथेच त्याने आपला सहकुटुंब डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला आणि तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. ते सारे एका झकासपैकी म्यूझिकवर डान्स करत होते. त्यामुळे वॉर्नर चर्चेत आला होता.

Story img Loader