ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर तो कसोटी क्रिकेट खेळणार नाही. दरम्यान, वॉर्नरने क्रिकेटरसिकांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. वॉर्नरने आता एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. ३७ वर्षीय वॉर्नरने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असला तरी पुढची दोन-तीन वर्षे तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळत राहील असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये चालू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पत्रकार परिषदेत डेव्हिड वॉर्नर म्हणाला, मला माझी पत्नी कँडिस आणि तिन्ही मुली, आयव्ही, इसला आणि इंडीला अधिक वेळ द्यायचा आहे. दरम्यान, वॉर्नरने सांगितलं की, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वरच्या क्रमांकावर फलंदाजाची आवश्यकता असेल तर तो निवृत्ती मागे घेऊन संघासाठी उपलब्ध असेल. पुढच्या वर्षी, म्हणजेच २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

वॉर्नरने स्पष्ट केलं की, गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना म्हणजेच अहमदाबादेत खेळवण्यात आलेला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना होता. वॉर्नर म्हणाला, मी कसोटीसह एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. मी ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान म्हणालो होतो की, भारतात विजय मिळवणं खूप मोठा पराक्रम असेल. आम्ही ती किमया करू शकलो, याचा मला खूप आनंद आहे.

“मला कल्पना आहे की, पुढच्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीसारखी महत्त्वाची स्पर्धा खेळवली जाणार आहे. तोवर मी असाच (चांगल्या फॉर्ममध्ये) खेळत राहिलो आणि त्यांना (ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला) माजी गरज असेल तर मी संघासाठी उपलब्ध असेन.”

वॉर्नरची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी

डेव्हिड वॉर्नरने १६१ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४५.३० च्या सरासरीने आणि ९७.२६ च्या स्ट्राईक रेटने ६,९३२ धावा जमवल्या आहेत. यादरम्यान त्याने २२ शतकं आणि ३३ अर्धशतकं झळकावली आहे. वॉर्नरने जानेवारी २००९ मध्ये होबार्ट येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याद्वारे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा जमवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याचा सहावा क्रमांक आहे.

हे ही वाचा >> IND vs SA 2nd Test : भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जडेजा-अश्विनमध्ये कोणाला मिळावे स्थान? इरफान पठाणने दिले उत्तर

त्याचबरोबर त्याने १११ कसोटी सामन्यांच्या २०३ डावांमध्ये ४४.०६ च्या सरासरीने ८,६९५ धावा जमवल्या आहेत. यामध्ये २६ शतकं आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे.