२०१४ हे वर्ष कोणताही क्रिकेट चाहता विसरू शकत नाही. खासकरून ऑस्ट्रेलियन चाहत्यांसाठी आणि क्रिकेटपटूंसाठी तो काळ कसोटीचा आणि मनस्तापाचा होता. त्याच वर्षी ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख क्रिकेटपटू फिल ह्युज याचा क्रिकेटच्या मैदानावर चेंडू लागून मृत्यू झाला होता. अवघ्या २५ व्या वर्षी त्याला हे जग सोडून जावे लागले. सिडनीच्या क्रिकेटच्या मैदानावर ती दुर्दैवी घटना घडली. तेव्हापासून एखाद्या फलंदाजाच्या मानेवर किंवा हेल्मेटवर जरी चेंडू लागला तरी साऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो.

Flashback : पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना कोणाच्यात रंगला होता माहिती आहे?

Ashes 2019 क्रिकेट मालिकेत असाच एक प्रसंग घडला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ फलंदाजी करताना जोफ्रा आर्चरचा चेंडू त्याच्या मानेवर आदळला आणि तो जमिनीवरच खाली कोसळला. त्यावेळी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. या घटनेबाबत ड्रेसिंग रूममध्ये नक्की काय भावना होत्या याबाबत नुकतेच डेव्हिड वॉर्नर आणि इतर सहकाऱ्यांनी ‘आपबिती’ व्यक्त केली.

CoronaVirus : रोहित शर्माने पोस्ट केला खास VIDEO, म्हणाला…

या प्रकरणाबाबत बोलताना वॉर्नरने आपबिती सांगितली. “जेव्हा तो मैदानावर धाडकन कोसळला तेव्हा माझ्या मनातून पहिले शब्द निघाले की नाही… परत असं घडू नये. असं काहीही परत घडायला नको”, अशा भावना त्याने व्यक्त केल्या. याच मुद्द्यावर बोलताना पीटर सीडल म्हणाला की आमच्यासाठी तो एक धक्का होता. प्रामुख्याने जेव्हा तो जमिनीवर कोसळला तेव्हाचा क्षण हा आम्हा साऱ्यांसाठी सर्वात भयावह क्षण होता.

Video : “कब्र बनेगी तेरी…”; गेलचा हिंदी डायलॉग ऐकून तुम्हालाही आवरणार नाही हसू

दरम्यान, या सामन्यात स्टीव्ह स्मिथला या प्रकारानंतर खेळता आले नव्हते. तसेच त्याला पुढच्या कसोटीलाही मुकावे लागले होते, पण त्यानंतर त्याने त्या पुढच्या कसोटी दमदार पुनरागमन केले होते.

Story img Loader