मैदानावरील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील बेशिस्त वर्तनामुळे प्रकाशझोतात येणारा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा सरावाला दांडी मारून अश्व शर्यतींच्या बैठकीला उपस्थिती लावण्याचा नवीन प्रताप पुढे आला आहे. यापूर्वी इंग्लंडच्या जो रुटशी बाचाबाची केल्याप्रकरणी वॉर्नरवर शिस्तभंगाची कारवाई केली होती आणि त्यामुळेच त्याला अॅशेस मालिकेच्या दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागले होते.
‘‘ही दुर्दैवाची बाब आहे, क्रिकेट चाहत्यांबरोबरच न्यू साऊथ वेल्स संघाची वॉर्नरकडून मैदानाबरोबरच मैदानाबाहेरही चांगल्या गोष्टींची अपेक्षा आहे,’’ असे न्यू साऊथ वेल्सचे अध्यक्ष अॅन्ड्रय़ू जोन्स यांनी सांगितले.
या साऱ्या प्रकारानंतर वॉर्नर म्हणाला की, ‘‘मी योग्य गोष्टी करीत असून सराव आणि फलंदाजीवर लक्ष केंद्रित करीत आहे. न्यू साऊथ वेल्स आणि ऑस्ट्रेलियासाठी धावा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.’’
सरावाला दांडी मारून वॉर्नर अश्व शर्यतीच्या बैठकीला हजर
मैदानावरील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील बेशिस्त वर्तनामुळे प्रकाशझोतात येणारा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा सरावाला दांडी मारून अश्व शर्यतींच्या बैठकीला उपस्थिती लावण्याचा नवीन प्रताप पुढे आला आहे.
First published on: 09-10-2013 at 04:29 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: David warner skips grade game attends horse race reports