मैदानावरील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील बेशिस्त वर्तनामुळे प्रकाशझोतात येणारा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा सरावाला दांडी मारून अश्व शर्यतींच्या बैठकीला उपस्थिती लावण्याचा नवीन प्रताप पुढे आला आहे. यापूर्वी इंग्लंडच्या जो रुटशी बाचाबाची केल्याप्रकरणी वॉर्नरवर शिस्तभंगाची कारवाई केली होती आणि त्यामुळेच त्याला अ‍ॅशेस मालिकेच्या दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागले होते.
‘‘ही दुर्दैवाची बाब आहे, क्रिकेट चाहत्यांबरोबरच न्यू साऊथ वेल्स संघाची वॉर्नरकडून मैदानाबरोबरच मैदानाबाहेरही चांगल्या गोष्टींची अपेक्षा आहे,’’ असे न्यू साऊथ वेल्सचे अध्यक्ष अ‍ॅन्ड्रय़ू जोन्स यांनी सांगितले.
या साऱ्या प्रकारानंतर वॉर्नर म्हणाला की, ‘‘मी योग्य गोष्टी करीत असून सराव आणि फलंदाजीवर लक्ष केंद्रित करीत आहे. न्यू साऊथ वेल्स आणि ऑस्ट्रेलियासाठी धावा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा