दक्षिण आफ्रिका संघाविरोधात खेळवण्यात आलेल्या सामन्यामध्ये बॉल टॅम्परिंग प्रकरणी आता आणखी एक विकेट पडली आहे. आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद या संघाच्या कर्णधारपदावरून ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू डेव्हिड वॉर्नर याने राजीनामा दिला आहे.
वाचा : Ball Tampering: डेव्हिड वॉर्नरची टीमच्या व्हॉट्स अॅप ग्रुपमधून एक्झिट
सनरायजर्स हैदराबादमध्ये झालेल्या या बदलाची माहिती या संघाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही ट्विटरच्या माध्यमातून दिली. ‘सध्या सुरु असणारे वाद आणि एकंदर परिस्थिती पाहता डेव्हिड वॉर्नरने कर्णधारपदावरुन माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. संघाच्या कर्णधारपदी कोणाची नव्याने निवड होणार हे लवकरच जाहीर करण्यात येईल’, असं या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
“In light of recent events, David Warner has stepped down as captain of SunRisers Hyderabad. The new captain of the Team will be announced shortly.” – K.Shanmugam, CEO, SunRisers Hyderabad
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 28, 2018
In light of recent events, David Warner has stepped down as captain of SunRisers Hyderabad. The new captain of the team will be announced shortly: SunRisers Hyderabad. (file pic) pic.twitter.com/vHbVK3DUB8
— ANI (@ANI) March 28, 2018
आयपीएलच्या ११ व्या हंगामावरही ऑस्ट्रेलियन संघाच्या बॉल टॅम्परिंगचे पडसाद उमटले असल्याचे पाहायला मिळत आहे. सनरायजर्स हैदराबादच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुनच वॉर्नरच्या पायउताराचं वृत्त देण्यात आलं. काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडूंवर आता टांगती तलवार असून खेळाडूंच्या कारकिर्दीवरही त्याचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. वॉर्नरपूर्वी स्टीव्ह स्मिथनेही राजस्थान रॉयल्स या संघाच्या कर्णधारपदावरून राजीनामा दिला होता.
दरम्यान, सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदी भारतीय संघातील खेळाडू शिखर धवन याची निवड होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर असं झालं तर आपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व संघ भारतीय खेळाडूंच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरतील. त्यामुळे वॉर्नरच्या हातून निसटलेला डाव सावरण्यासाठी आता नेमकी कोणाच्या नावाला पसंती मिळणार याकडेच संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.