ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आपल्या धडाकेबाज खेळासाठी ओळखला जातो. श्रीलंकेत सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत काल (२१ जून) झालेल्या सामन्यात त्याचे शतक थोडक्यात हुकले. याचदरम्यान, सोशल मीडियावरील त्याचा एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. वॉर्नर सोशल मीडियावर विशेषत: इन्स्टाग्रामवर सतत काहीना काही नवीन गोष्टी करताना दिसतो. त्याने आतापर्यंत आपल्या मुलींसोबत मिळून अनेक व्हिडिओ तयार केलेले आहेत. इतकेच नाहीतर अनेक अभिनेत्यांच्या चेहऱ्यावर आपला चेहरा सुपरइम्पोज करूनही तो व्हिडिओ तयार करतो. आतादेखील त्याने अशीच करामत केली आहे.

हेही वाचा – मायकल वॉन आणि वसीम जाफरमध्ये पुन्हा जुंपली! फोटोमुळे सुरू झाले ट्विटर युद्ध

आपल्या नवीन इन्स्टाग्राम पोस्टमध्ये वॉर्नरने हॉलिवूड फ्रँचायझी ‘द कराटे किड’मधील कल्ट कॅरेक्टर डॅनियल ला रुसोवर आपल्या चेहरा लावला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करून वॉर्नरने चाहत्यांना चित्रपट ओळखण्यास सांगितले आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

वॉर्नरने यापूर्वी टॉम क्रूझच्या ‘टॉप गन: मॅव्हरिक’ चित्रपटातील मॅव्हरिकच्या पात्रावर स्वत:चा चेहरा लावून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. याशिवाय वॉर्नर हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांचाही चाहता आहे. त्याने पुष्पा आणि बाहुबलीसारख्या प्रसिद्ध तेलुगु चित्रपटांचेही व्हिडिओ तयार केले आहेत. विशेष म्हणजे या व्हिडिओंमध्ये त्याची पत्नी आणि मुलीदेखील उत्साहाने भाग घेतात.

Story img Loader