David Warner on Indian Fans PSL 2025: आयपीएल २०२५ मध्ये एकापेक्षा एक अटीतटीचे सामने खेळवले जात आहेत. दरम्यान पाकिस्तानमध्येही पाकिस्तान सुपर लीगला सुरूवात झाली आहे. पहिल्यांदाच पीएसएलचं आयोजन आयपीएल सुरू असताना करण्यात आलं आहे. आयपीएलचा भाग नसलेले अनेक खेळाडू पीएसएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. यावेळी वॉर्नरला आयपीएलमध्ये संधी मिळाली नसली तरीही, भारताविरुद्ध द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी पत्रकाराला त्याने योग्य उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. वॉर्नर कराची किंग्जचा कर्णधार आहे आणि त्याच्या संघाला पहिला सामना मुलतान सुलतानविरुद्ध खेळायचा आहे. मुल्तान सुल्तान्सचा कर्णधार मोहम्मद रिझवान आहे. वॉर्नर त्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अद्याप या लीगचा भाग होऊ शकलेला नसल्याचे त्याने सांगितले. पण भारताची बाजू नेमका काय म्हणाला वॉर्नर जाणून घेऊया.

पत्रकार परिषदेदरम्यान कराची किंग्जचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्याच वेळी, जेव्हा एका पत्रकाराने त्याला विचारले की पीएसएल खेळणार असल्यामुळे भारतीय चाहत्यांनी त्याला खूप ट्रोल केले. यावर त्याने रिपोर्टरला फटकारले. आयपीएल लिलावात वॉर्नर अनसोल्ड राहिला होता आणि म्हणूनच तो पीएसएल खेळत आहे, असे चाहते म्हणत असल्याचे पत्रकाराने विचारले.

वॉर्नर यावर उत्तर देताना म्हणाला, “मी पहिल्यांदाच अशा गोष्टी ऐकत आहे. मला फक्त क्रिकेट खेळायचं आहे. राष्ट्रीय कर्तव्यात व्यस्त असल्याने मी पीएसएल खेळू शकलो नाही. पण आता माझं काम कराची संघाला या वर्षी विजेतेपद मिळवून देणं आहे.”

गेल्या हंगामात वॉर्नर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. पण नोव्हेंबरमध्ये फ्रँचायझीने त्याला रिलीज केले. डेव्हिड वॉर्नर हा आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादला २०१६ चे विजेतेपद मिळवून दिले. आतापर्यंत त्याने लीगमध्ये एकूण १८४ सामने खेळले आहेत आणि ६५६५ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ४ शतकं आणि ६२ अर्धशतकं आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: David warner supports indian fans in psl pakistan super league after pakistani reporter asks questions about spreading hate bdg