Australia vs Pakistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध झंझावाती शतक झळकावले. एवढेच नाही तर त्याचा सलामीचा जोडीदार मिचेल मार्शच्या साथीने विक्रमी २५९ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियासाठी विश्वचषक इतिहासातील ही सर्वात मोठी सलामीची भागीदारी ठरली. याआधी शेन वॉटसन आणि ब्रॅड हॅडिन यांनी २०११ मध्ये १८३ धावांची भागीदारी केली होती. त्याचबरोबर वॉर्नरने एकदिवसीय विश्वचषकातील पाचवे शतक झळकावून एक मोठा विक्रम केला आहे. या शतकी खेळीच्या जोरावर त्याने पाच महान खेळाडूंना मागे टाकले. या खेळीत त्याने १२४ चेंडूत १४ चौकार आणि ९ षटकारांसह १६३ धावा केल्या.

सौरव गांगुलीसह पाच दिग्गजांना मागे टाकले –

याआधी वनडे वर्ल्ड कपमध्ये सौरव गांगुली, एबी डिव्हिलियर्स, मार्क वॉ, तिलकरत्ने दिलशान आणि महेला जयवर्धने यांनी प्रत्येकी चार शतके झळकावली होती. वॉर्नरने या स्पर्धेच्या इतिहासातील पाचवे शतक झळकावून या पाच महान खेळाडूंना मागे सोडले. या यादीत रिकी पाँटिंग आणि कुमार संगकारा वॉर्नरच्या बरोबरीने आहेत. रोहित शर्मा पहिल्या तर सचिन तेंडुलकर दुसऱ्या स्थानावर आहे.

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’

एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक शतके ठोकणारे टॉप-५ फलंदाज –

७ – रोहित शर्मा
६ – सचिन तेंडुलकर
५ – रिकी पाँटिंग
५ – कुमार संगकारा
५ – डेव्हिड वॉर्नर</p>

हेही वाचा – AUS vs PAK: मिचेल मार्श आणि डेव्हिड वार्नरने शतकांच्या जोरावर रचला इतिहास, ऑस्ट्रेलियासाठी ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिली जोडी

डेव्हिड वॉर्नरने विराट कोहलीच्या विक्रमाशी केली बरोबरी –

डेव्हिड वॉर्नरचे हे पाकिस्तानविरुद्धचे सलग चौथे एकदिवसीय शतक ठरले. संपूर्ण जगात कोणत्याही संघाविरुद्ध सलग चार एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक ठोकण्याचा विक्रम फक्त विराट कोहलीच्या नावावर आहे. आता डेव्हिड वॉर्नरने कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. विराटने २०१७ ते २०१८ या कालावधीत वेस्ट इंडिजविरुद्ध ४ शतके झळकावली होती. आता वॉर्नरने २०१७ ते २०२३ या कालावधीत सलग चार एकदिवसीय सामने खेळताना पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले आहेत. वॉर्नरच्या वनडे कारकिर्दीतील हे एकूण २१ वे शतक ठरले.

डेव्हिड वॉर्नरची विश्वचषक २०२३ मधील कामगिरी –

या सामन्यापूर्वी डेव्हिड वॉर्नर सध्याच्या विश्वचषकात विशेष काही करू शकला नाही. त्याने भारताविरुद्ध ४१ धावा (५२ चेंडू) केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १३ धावा आणि श्रीलंकेविरुद्ध ११ धावा करून तो बाद झाला होता. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर त्याने पंचांवरही प्रश्न उपस्थित केले होते. आता त्याने मैदानावर आपला राग आपल्या फलंदाजीत काढला आणि पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट शतक झळकावले.