World Cup 2023, India vs Australia Match Upadates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील पाचव्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. या भारताविरुद्धच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वार्नरने फक्त ८ धावा काढताच, त्याने इतिहास रचला. डेव्हिड वॉर्नर एकदिवसीय विश्वचषकात सर्वात कमी डावात १००० धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे. या दरम्यान त्याने सचिन तेंडुलकर आणि एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला.
डेव्हिड वॉर्नरने सचिन आणि एबी डिव्हिलियर्सचा मोडला विक्रम –
डेव्हिड वॉर्नरने चेन्नईच्या चेपॉक मैदानावर भारताविरुद्ध ८ धावा केल्या आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वात जलद १००० धावा करणारा फलंदाज बनला. डेव्हिड वॉर्नरने अवघ्या १९ डावात ही कामगिरी केली. तसेच सचिन तेंडुलकर आणि एबी डिव्हिलियर्स यांना मागे टाकले. सचिन तेंडुलकर आणि एबी डिव्हिलियर्स हे एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वात जलद १००० धावा करणारे फलंदाज होते. या दोघांनीही २० डावांमध्ये हा पराक्रम केला होता, परंतु आता दोघेही संयुक्त दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत.
एकदिवसीय विश्वचषकात सर्वात कमी डावात १००० धावा पूर्ण करणारे फलंदाज –
१९ डाव – डेव्हिड वॉर्नर<br>२० डाव – सचिन तेंडुलकर/एबी डिव्हिलियर्स
२१ डाव – विव्ह रिचर्ड्स/सौरव गांगुली
२२ डाव – मार्क वॉ
२२ डाव – हर्शल गिब्स
हेही वाचा – IND vs AUS, World Cup 2023: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात गोंधळ घालणारा ‘जार्व्हो ६९’ आहे तरी कोण? जाणून घ्या
या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली आणि संघाचा सलामीवीर मिचेल मार्श शून्यावर बाद झाला. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या फलंदाजाला शून्यावर बाद करण्यात भारतीय गोलंदाजाला यश आले. मार्शला जसप्रीत बुमराहने स्लिपमध्ये विराट कोहलीच्या हाती झेलबाद केले. त्याचबरोबर विराट कोहली एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू बनला आहे. त्याने अनिल कुंबळेचा विक्रम मोडला.
एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक झेल (विकेटकीपर नसलेले)
१५ – विराट कोहली*
१४- अनिल कुंबळे
१२ – कपिल देव
१२ – सचिन तेंडुलकर