ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरेही देताना दिसतो, मात्र शुक्रवारी विराट कोहलीच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट केल्यानंतर त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. काल म्हणजेच २ सप्टेंबरला विराटने आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माचा फोटो होता. या फोटोवर वॉर्नरने कमेंट केली. मात्र, ही कमेंट त्याला चांगलीच महागात पडलेली दिसतेय.

त्याचं झालं असं, वॉर्नरने विराटच्या या पोस्टवर ‘लकी मॅन, मेट.’ अशी कमेंट केली. मात्र, विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांनी या कमेंटचा चुकीचा अर्थ घेऊन वॉर्नरचा चांगलाच समाचार घेतला.

Viral Video : आगीशी खेळ पडला महागात; गणेशोत्सवादरम्यान स्टंट करताना त्याने स्वतःलाच घेतलं पेटवून अन्…

या ट्रोलिंगचं प्रमाण इतकं वाढलं की वॉर्नरला आपल्या कमेंटचं स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. त्याने विराट-अनुष्काच्या एका फॅनला कमेंट करत म्हटलंय, “आम्ही ऑस्ट्रेलियात ही म्हण वापरतो. जसं मी म्हणतो की कँडिस वॉर्नर माझ्यासोबत आहे यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण इतरांना हे म्हणतो तेव्हा आम्ही त्याला ‘लकी मॅन, मेट.’ असे म्हणतो. हे समजून घेणे थोडे वेगळे कठीण असू शकते.”

david warner virat kohli anushka sharma

वॉर्नरच्या स्पष्टीकरणानंतर अनेक चाहते त्याच्या समर्थनार्थ पुढे आले, पण त्यानंतरही काहीजण वॉर्नरला ट्रोल करत होते. दरम्यान, विराट कोहलीनेही वॉर्नरच्या समर्थनार्थ कमेंट केली. “मला माहित आहे मेट” असे त्याने कमेंटमध्ये लिहिले.

Optical Illusion : केवळ २० सेकंदात तुम्हाला या चित्रात लपलेल्या मांजरी शोधून दाखवा; ९९% लोक झाले फेल

david warner virat kohli anushka sharma

विशेष म्हणजे विराट कोहली बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे. त्याने आपले शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक सुमारे तीन वर्षांपूर्वी केले होते. दरम्यान, विराट कोहलीने आशिया चषक २०२२ मध्ये हाँगकाँगविरुद्ध ५० धावांचा टप्पा पार केला. आता आशिया चषक २०२२ च्या आगामी सामन्यांमध्ये विराट कोहली सर्वोत्तम प्रदर्शन दाखवेल, अशी आशा केली जात आहे.

Story img Loader