धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मधल्या फळीतील फलंदाज उस्मान ख्वाजा यांच्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी २ बाद ३८९ अशी दमदार मजल मारली आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा पुरेपूर फायदा त्यांच्या फलंदाजांनी उचलला. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर अंकुश ठेवला. सलामीवीर जो बर्न्स (७१) आणि वॉर्नर यांनी १६१ धावांची दणदणीत सलामी दिली. बर्न्स बाद झाल्यावर वॉर्नरने ख्वाजाच्या साथीने धावांचा ओघ वाढवला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी रचली. जेम्स नीशामने वॉर्नरला बाद करत ही जोडी फोडली. वॉर्नरने १९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १६३ धावांची तडफदार खेळी साकारली. पहिल्या दिवसाची काही षटके शिल्लक ख्वाजानेही शतक पूर्ण केले. त्याने १० चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर नाबाद १०२ धावांची खेळी साकारली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा