IPL 2023 Updates: ऑस्ट्रेलियन सलामीवीर पुन्हा एकदा आयपीएलचे नेतृत्व करताना दिसणार आहे. ऋषभ पंतला रस्ता अपघातात गंभीर दुखापत झाल्यानंतर, संघ नवीन कर्णधाराच्या शोधात होता, याला गुरुवारी फ्रेंचायझीने पुष्टी दिली. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार असेल. तो जखमी ऋषभ पंतची जागा घेणार आहे. त्याचबरोबर संघाचा उपकर्णधार म्हणून अक्षर पटेलच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
याबाबत दिल्ली कॅपिटल्सने ट्विट करुन माहिती दिली आहे. दुखापतग्रस्त ऋषभ पंत यावेळी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. या आयपीएलच्या नव्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सनेही परदेशी खेळाडूवर विश्वास व्यक्त केला आहे. आयपीएलच्या नवीन हंगामात, दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना १ एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध होणार आहे.
यापूर्वी हैदराबादचा कर्णधार होता –
डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सपूर्वी सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार होता. हैदराबादने त्याच्या नेतृत्वाखाली एकूण ६७ सामने खेळले, त्यापैकी ३५ सामने जिंकले, तर ३१ सामने हरले. डेव्हिड वॉर्नर आयपीएलचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्ये १६२ सामने खेळले आहेत. त्याने १४०.०१च्या स्ट्राइक रेटने एकूण ५८८१ धावा केल्या आहेत. यामध्ये ४ शतके आणि ५४ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याच्या बॅटमधून ५६१ चौकार आणि २११ षटकार आले आहेत.
अक्षरवरही मोठी जबाबदारी आली –
ऑस्ट्रेलियाविरुद्ध अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अक्षर पटेलवरही दिल्ली कॅपिटल्सने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्याला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. अक्षरने आयपीएलमध्ये एकूण १२२ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १२८.८३ च्या स्ट्राईक रेटने ११३५ धावा केल्या आहेत. याशिवाय गोलंदाजीतही शानदार कामगिरी केली आहे. त्याने १२२ सामन्यात ७.२५च्या इकॉनॉमीने १०१ विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – Rohit Sharma: डीजे मार्टिन गॅरिक्सला रोहितने दिली जर्सी भेट; भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
हैदराबादला जेतेपद मिळवून दिले होते –
सनरायझर्स हैदराबादने आयपीएलमध्ये एकदाच विजेतेपद पटकावले आहे. यादरम्यान संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर होता. २०१६ च्या विजेतेपदाच्या सामन्यात त्याने तुफानी खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला. त्यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ८ धावांनी पराभव केला. डेव्हिड वॉर्नरने १८१.५८च्या स्ट्राईक रेटने ३८ चेंडूत ८ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ६९ धावा केल्या.