सध्या देशात गणेशोत्सवाची धूम आहे. दिग्गज नेते, खेळाडू तसेच सेलिब्रिटींच्या घरात गणेशाचे आगमन झाले आहेत. असे असताना ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरनेही थेट ऑस्ट्रेलियातून भारतीयांना गणेत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने स्वत:चा गणपती बाप्पासोबतचा खास फोटो ट्वीट केलाय. या फोटोची तसेच वॉर्नरने दिलेल्या या शुभेच्छांची सगळीकडे चर्चा होत आहे.
हेही वाचा >> India vs Hong Kong : टीम इंडियाची आज हाँगकाँगशी लढत, भारतीय संघात बदल होणार का? जाणून घ्या Playing 11
गणेश चतुर्थीनिमित्त ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याने सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना तो बाप्पासमोर नतमस्तक झाला आहे. बाप्पाला होत जोडतानाचा फोटो त्याने शोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच “भारतातील माझ्या सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे आयुष्य आनंदमय होवे,” अशा सदिच्छादेखील त्याने दिल्या आहेत. त्याच्या या खास शुभेच्छा भारतीयांना चांगल्याच आवडल्या आसून भारतीय क्रिकेटप्रेमी त्याच्या या पोस्टवर कमेंट्स करत आहेत.
हेही वाचा >> त्याने बांगलादेशच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं अन् रचला ‘हा’ अनोखा विक्रम; अफगाणीस्तानच्या गोलंदाजाने केली कमाल
दरम्यान, डेव्हिड वॉर्नरचे भारतात लाखोंनी चाहते आहेत. दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूने साकारलेले पुष्पा चित्रपटातील पुष्पराज हे पात्र वॉर्नरला खूप आवडते. तो अनेक सामन्यांमध्ये पुष्पा चित्रपटातील ‘झुकेना नही’ हा डायलॉग म्हणताना दिसलेला आहे. तसेच पुष्पाची अॅक्शनदेखील त्याने अनेकवेळा केलेली आहे. याच कारणामुळे भारतात त्याचे खास चाहेत असून त्याला क्रिकेटमधील पुष्पा म्हटले जाते. आयपीएल २०२२ चा हंगाम तो दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला होता. या हंगामात त्याने संघाला अनेकवेळा एकहाती विजय मिळवून दिला होता.