आज आयपीएलमध्ये होणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्धच्या सामन्याआधी दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगने अनुभवी फलंदाज सुरेश रैनाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश रैनाने वैयक्तिक कारणास्तव गेल्या हंगामात आयपीएलमधून आपले नाव मागे घेतले होते. मात्र, या हंगामात तो खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
गेल्या हंगामात सुरैश रैनाच्या अनुपस्थितीचा फटका चेन्नई सुपर किंग्जला सहन करावा लागला. संघाची कामगिरी चांगली झाली नाही आणि पहिल्यांदा ते प्लेऑफसाठी पात्र ठरू शकले नाहीत॰ मागच्या वर्षी गुणतालिकेत सीएसकेचा संघ सातव्या क्रमांकावर होता.
रिकी पाँटिंगचे सुरेश रैनाबद्दलचे वक्तव्य
सीएसकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाँटिंग म्हणाला, ”चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. त्याच्याकडे एक महान कर्णधार असून संघही जबरदस्त आहे. सीएसकेने सातत्याने सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळले आहे. मागील हंगाम त्यांच्यासाठी चांगला नव्हता आणि माझ्यासाठी सुरेश रैनाची अनुपस्थिती ही त्य़ाला कारणीभूत ठरली. या मोसमात तो संघात परत आला आहे. मागील हंगामात चेन्नई सुपर किंग्जमध्ये सुरेश रैनाची कमतरता स्पष्टपणे भासली.”
मागील मोसमातील कामगिरीवर नजर टाकल्यास दिल्ली कॅपिटल्सची टीम चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध अधिक बळकट दिसत आहे. तथापि, सीएसकेला कमी लेखणे ही त्यांच्यासाठी एक मोठी चूक असेल. मागील वर्षाचे अपयश बाजुला सारून महेंद्रसिंह धोनी विजयासह आयपीएलच्या मोहिमेला प्रारंभ करेल.
आजच्या सामन्यासाठी संभाव्य प्लेईंग XI
दिल्ली कॅपिटल्स
पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, शिमरॉन हेटमायर, ऋषभ पंत (कर्णधार), मार्कस स्टोइनिस, आर. अश्विन, अमित मिश्रा, ख्रिस वोक्स, ईशांत शर्मा, स्टीव्ह स्मिथ.
चेन्नई सुपर किंग्ज
फाफ डु प्लेसिस, रॉबिन उथप्पा, अंबाटी रायुडू, सुरेश रैना, सॅम करन, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, मोईन अली, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, इम्रान ताहीर.