UP Warriorz Women vs Delhi Capitals Women Match Updates: महिला प्रीमियर लीग 2023 चा पाचवा सामना 7 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्सच्या महिला संघांमध्ये खेळला जाईल. हा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये निकराची लढत होणार आहे. दिल्ली आणि यूपी संघांनी पहिला सामना जिंकला आहे. मेग लॅनिंगच्या संघाने पहिल्या सामन्यात आरसीबीचा ६० धावांनी पराभव केला. दुसरीकडे, एलिसा हिलीच्या नेतृत्वाखालील यूपी वॉरियर्स संघाने गुजरात जायंट्सचा तीन गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही केव्हा आणि कुठे पाहू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो.

WPL २०२३चा ५वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल. मागील सामने जिंकून हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. कॅपिटल्सने आरसीबीचा ६० धावांनी पराभव केला, तर वॉरियर्सने रोमहर्षक सामन्यात जीजीचा ३ गडी राखून पराभव केला. अशा परिस्थितीत क्रिकेट चाहत्यांना एक रोमांचक सामना बघायला मिळू शकतो.

या सामन्यात कोणत्याही फलंदाज किंवा अष्टपैलू खेळाडूवर सट्टा लावणे हा योग्य निर्णय असेल. शफाली वर्मा किंवा मेग लॅनिंग यांची कर्णधार म्हणून निवड होऊ शकते. या दोन्ही खेळाडूंनी गेल्या सामन्यात तुफानी खेळी खेळली. शफालीने ४५ चेंडूत ८४ तर मेग लॅनिंगने ४३ चेंडूत ७२ धावा केल्या. वॉरियर्स संघाचा कर्णधार किंवा उपकर्णधार म्हणून ग्रेस हॅरिसकडे पाहिले जाऊ शकते. हॅरिसने गेल्या सामन्यात गुजरात जायंट्सकडून विजय हिसकावून घेतला. त्याने २६ चेंडूत ५९ धावा फटकावल्या. जर तुम्हाला गोलंदाज किंवा अष्टपैलू खेळाडूवर बाजी मारायची असेल, तर दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन किंवा तारा नॉरिस या सर्वात वरच्या निवडी असतील.

पीच रिपोर्ट

डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना होणार आहे. येथील खेळपट्टी फलंदाजांना मदत करते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या ड्रीम टीममध्ये अधिकाधिक फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंचा समावेश करू शकता. या खेळपट्टीवर पहिल्या डावाची सरासरी १७९ धावांची आहे. नाणेफेक जिंकणारा संघ विरोधी संघाला प्रथम फलंदाजी करण्यास सांगू शकतो. सामन्यात दव फॅक्टर येण्याची शक्यताही असेल. येथे शेवटचा सामना गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये शेवटच्या षटकात ग्रेस हॅरिसच्या शानदार खेळीच्या जोरावर यूपीने विजय मिळवला. दोन्ही संघांनी जवळपास १७० धावा केल्या होत्या.

हेही वाचा: Rishabh Pant: “तुमच्यामते हा कोण…”, बुद्धिबळ खेळताना मध्यभागी बसलेल्या ऋषभच्या प्रश्नाचे उत्तर पाहा तुम्हाला सापडते का?

सामना कधी, कुठे आणि कसा पाहू शकाल?

यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. हा सामना डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स १८ आणि जिओ सिनेमावर पाहू शकतो.

Story img Loader