Cut match fee to teach Ayush Badoni a lesson : भारताची देशांतर्गत स्पर्धा रणजी ट्रॉफीमध्ये एक लाजिरवाणी घटना घडली आहे. दिल्ली संघावर भेदभावाचा आरोप करण्यात आला आहे. काही काळापासून फॉर्मात नसलेला संघाचा सर्वोत्तम फलंदाज आयुष बदोनी याला धडा शिकवण्यासाठी संघाने हॉटेलमध्ये थांबण्यास सांगितले होते. दिल्ली संघातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयुषशी भेदभाव केल्याचा आरोप आहे. मात्र, बदोनीला वगळल्यानंतरही दिल्ली संघाची स्थिती सुधारली नाही आणि मोहालीत उत्तराखंडविरुद्धच्या रणजी करंडक गट-ड सामन्यात संघ १४७ धावांत ऑलआऊट झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्षितिजला संधी देण्यासाठी बदोनीला वगळण्यात आले –

गेल्या सामन्यात ४१ धावा करणाऱ्या बदोनीला वगळण्याचे कारण म्हणजे क्षितिज शर्माला संधी देणे. दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले, क्षितिजला मैदानात उतरवण्याचा आणि विशेषत: बदोनीला १५ खेळाडूंमधून बाहेर ठेवण्याचा दबाव होता. जेणेकरून त्याला बीसीसीआयकडून मॅच फी देखील मिळू नये. बीसीसीआआय मॅच फीसाठी फक्त १५ खेळाडू पात्र आहेत. कारण त्याला पीएमओएमध्ये येण्याची परवानगी नसल्यामुळे त्याला हॉटेलमध्ये ठेवणे योग्य होते.

बदोनीला हॉटेलमध्ये का ठेवले होते?

मात्र, शेजारील व्हीआयपी गॅलरीतून सामना बघता येत असताना त्याला मैदानात का आणले नाही, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. “संघ व्यवस्थापकांना त्याच्या जेवणाची वेगळी व्यवस्था करावी लागली असती. कारण बीसीसीआय त्यासाठी पैसे देत नाही आणि पंजाब क्रिकेट असोसिएशनचे शिबिर सुरू असल्याने तो मॅच ब्रेक किंवा ब्रेकच्या वेळीही नेटवर जाऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याला हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – IND vs ENG 1st Test : जसप्रीत बुमराहने रोहित शर्माची चूक सुधारताच केले जबरदस्त सेलिब्रेशन, VIDEO होतोय व्हायरल

आयपीएलचे दोन हंगाम खेळल्यानंतर बदोनीने देशांतर्गत क्रिकेटमधील सूर गमावला आहे आणि त्याला हॉटेलमध्ये ठेवणे हा त्याला धडा शिकवण्याचा एक मार्ग होता, असे डीडीसीएचे मत आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, ‘जर आयुषने १०० धावा केल्या असत्या, तर ज्यांना त्याला दिल्ली क्रिकेटमधून बाहेर पाहायचे आहे त्यांना आवाज उठवण्याची आणि क्षितिजसारख्या क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्याची संधी मिळाली नसती, जो ड्रेसिंग रूममध्ये राहण्यास पात्र नाही. वरिष्ठ अधिकारी म्हणाले, ‘क्षितिजनेही धावा न केल्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.’

हेही वाचा – SPL 2024 : अंपायरने अपील न होताच फलंदाजाला केले बाद घोषित, पाकिस्तानमधील सामन्यातील VIDEO होतोय व्हायरल

रोहन जेटली कठोर वृत्ती स्वीकारू शकतात –

क्षितिजला दिल्लीतील अनेक लोक क्लब लेव्हलचा चांगला क्रिकेटर मानतात. मात्र, तो अगदी सहज बाद झाला. एवढेच नाही तर सध्याच्या सामन्यानंतर परिस्थिती आणखी बिघडल्यास डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली आक्रमक पवित्रा घेतील अशीही माहिती समोर आली आहे. एक अधिकारी म्हणाला, ‘रोहनची प्रकृती सध्या चांगली आहे, पण आता त्याच्यावर कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. क्षितिजने दुसऱ्या डावात धावा केल्या नाहीत, तर अध्यक्षांच्या हस्तक्षेपाची आवश्यकता असेल.’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ddca accused of dropping ayush badoni from the team to make way for kshitij sharma in ranji trophy 2024 vbm
Show comments