ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डीव्हिलियर्सच्या धडाकेबाज फलंदाजीने पाया रचल्यानंतर कायले जॅमीसनच्या भेदक माऱ्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुच्या विजयाचा कळस चढवला. बेंगळूरुने सलग तिसऱ्या विजयासह रविवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२०च्या गुणतालिकेत अग्रस्थानी मुसंडी मारताना कोलकाता नाइट रायडर्सवर ३८ धावांनी विजयाची नोंद केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डीव्हिलियर्स (नाबाद ७६ धावा) आणि मॅक्सवेल (७८ धावा) यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या बळावर प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद २०४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्यानंतर कोलकाताला निर्धारित षटकांत ८ बाद १६६ धावसंख्येवर रोखले.

संक्षिप्त धावफलक

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : २० षटकांत ४ बाद २०४ (ग्लेन मॅक्सवेल ७८, एबी डीव्हिलियर्स नाबाद ७६; वरुण चक्रवर्ती २/३९) विजयी वि. कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ८ बाद १६६ (आंद्रे रसेल ३१, ईऑन मॉर्गन २९; कायले जॅमीसन ३/४१)