13 year old Shreyas Harish dies in racing accident: वेगाच्या छंदाने एका १३ वर्षीय मुलाचा जीव घेतला आहे. ही घटना मद्रास इंटरनॅशनल सर्किट येथे एमआरएफ एमएमएससी एफएमएससीआय इंडियन नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये घडली. या स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीदरम्यान झालेल्या अपघातामुळे बंगळुरू येथील १३ वर्षीय प्रतिभावान रेसर कोपाराम श्रेयस हरीशचा शनिवारी मृत्यू झाला. श्रेयसने १० दिवसांपूर्वीच त्याचा १३वा वाढदिवस साजरा केला होता.

या दुःखद घटनेनंतर स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमाच्या प्रवर्तकांनी शनिवार आणि रविवारी होणारे उर्वरित कार्यक्रम रद्द केले. श्रेयसचा जन्म २६ जुलै २०१० रोजी झाला होता. तो बंगळुरूमधील केन्सारी शाळेचा विद्यार्थी होता आणि बाइक रेसिंगच्या जगात एक उगवता तारा होता. पेट्रोनास रुकी प्रकारात स्पर्धा करताना त्याने राष्ट्रीय स्तरावर अनेक शर्यती जिंकल्या होत्या. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर सलग चार शर्यती जिंकल्या होत्या.

Shivaji Park ground, Shivaji Park, MNS Shivaji Park,
शिवाजी पार्कचे मैदानाचा निर्णय गुलदस्त्यात, महायुतीने मैदान अडवल्यामुळे ४५ दिवसांची मर्यादा संपल्याचा मनसेचा आरोप
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू –

ही घटना शनिवारी घडली असून तो सकाळीच पोल पोझिशनवर पात्र ठरला होता. शर्यतीच्या सुरुवातीला टर्न-1 मधून बाहेर पडताना श्रेयस अपघात झाला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर ट्रॅकवर उभ्या असलेल्या ट्रॉमा केअर रुग्णवाहिकेतून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ज्यावेळी त्याचे निधन झाले, त्यावेळी त्याचे वडील त्याच्यासोबत होते.

हेही वाचा – MS Dhoni: कॅप्टन कूलची मुलगी झिवा रांचीच्या ‘या’ शाळेत शिकते, फी जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य वाटेल

या दुःखद घटनेनंतर एमएमएससीचे अध्यक्ष अजित थॉमस म्हणाले की, ‘इतका तरुण आणि प्रतिभावान रायडर गमावणे दु:खदायक आहे. श्रेयसमध्ये उत्कृष्ट रेसिंग प्रतिभा होती. घटनेनंतर त्याला तातडीने घटनास्थळी वैद्यकीय मदत करून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. या अत्यंत दुःखद घटनेनंतर आम्ही इतर कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमएससी मनापासून शोक व्यक्त करतो.’ या वर्षी मे महिन्यात, श्रेयसने मिनीजीपी इंडियाचे विजेतेपद जिंकल्यानंतर स्पेनमधील मिनीजीपी शर्यतीत भाग घेतला आणि दोन्ही शर्यतींमध्ये अनुक्रमे पाचव्या आणि चौथ्या स्थानावर राहिला.

हेही वाचा – Global T20 Canada: मोहम्मद रिझवानच्या स्लेजिंगमुळे इफ्तिखार अहमदने गमावली विकेट, VIDEO होतोय व्हायरल

श्रेयस ऑगस्टमध्ये मलेशियातील सेपांग सर्किट येथे २०२३ एमएसबीके चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणार होता. तो 250cc प्रकारात टीम सीआरए मोटरस्पोर्ट्सचे प्रतिनिधित्व करत होता. भारतीय मोटरस्पोर्टमधील या वर्षातील हा दुसरा मृत्यू आहे. जानेवारीमध्ये, मद्रास इंटरनॅशनल सर्किट येथे एमआरएफ एमएमएससी एफएमएससीआय इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप २०२२ च्या दुसऱ्या फेरीदरम्यान अपघात झाला होता. ज्यानंतर ५९ वर्षीय सुप्रसिद्ध आणि प्रतिष्ठित रेसर केई कुमार यांचे रुग्णालयात निधन झाले होते.