भारताचा माजी वेगवान गोलंदाज देबाशीष मोहंती आणि माजी यष्टीरक्षक एमएसके प्रसाद यांचा बीसीसीआयच्या तांत्रिक समितीत समावेश करण्यात आला आहे. अनिल कुंबळेच्या नेतृत्त्वाखाली ही नऊ सदस्यीय समितीची रचना करण्यात आली आहे. २९ सप्टेंबरला बीसीसीआयच्या चेन्नईत वार्षिक सर्वसाधारण सभेत तांत्रिक समितीतील सदस्यांची घोषणा काही दिवसांतच संकेतस्थळावर होईल असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी सदस्यांची माहिती जाहीर करण्यात आली. निवड समिती प्रमुख संदीप पाटील या समितीचे सदस्य आहेत. कृष्ममुर्ती हुडा (उत्तर), बिमल भारती (पूर्व), विजय नायडू (मध्य), रवी देशमुख (पश्चिम), व्ही.के. रामास्वामी (माजी कसोटी पंच) यांचा या समितीत समावेश आहे. बीसीसीआयच्या मैदान आणि खेळपट्टी समितीचे प्रमुखपद दलजीत सिंग यांच्याकडेच असणार आहे. या समितीतील अन्य सदस्य पी.आर. विश्वनाथन (दक्षिण), आशिष भौमिक (पूर्व), धीरज प्रसन्ना (पश्चिम० आणि तापोश चटर्जी (मध्य) हे या समितीत असणार आहे.
विपणनासाठी बीसीसीआयने दोन मोठय़ा उपसमित्यांची आखणी केली आहे.
देबाशीष मोहंती आणि एमएसके प्रसाद बीसीसीआयच्या तांत्रिक समितीवर
भारताचा माजी वेगवान गोलंदाज देबाशीष मोहंती आणि माजी यष्टीरक्षक एमएसके प्रसाद यांचा बीसीसीआयच्या तांत्रिक समितीत समावेश करण्यात आला आहे.
First published on: 02-10-2013 at 04:52 IST
TOPICSएम. एस. के. प्रसाद
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Debashish mohanty msk prasad find place in technical committe