डेक्कन जिमखाना व पूना क्लब यांच्यात गोल्डफिल्ड अलुरा-मांडके चषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लढत होणार आहे. ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखानातर्फे आयोजित करण्यात आली आहे.
उपांत्य फेरीत डेक्कन संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा सात गडी राखून पराभव केला. त्या वेळी फलंदाजीत डेक्कन संघाकडून राहुल त्रिपाठी, अमेय श्रीखंडे यांनी शानदार कामगिरी केली. अन्य लढतीत पूना क्लबने क्रिकेट मास्टर्स अकादमीला आठ गडी राखून पराभूत केले. पूना क्लबच्या या विजयाचे श्रेय अजिंक्य नाईक, पराग मोरे व हृषीकेश सपकाळ यांच्या शैलीदार फलंदाजीस द्यावे लागेल. अंतिम सामना २८ व २९ मार्च रोजी पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावर होणार आहे.
संक्षिप्त निकाल-१.पीवायसी हिंदू जिमखाना-२२९ (रोहित कारंजकर ७९, प्रितम पाटील ४७, अक्षय जाधव ३/५४, रमेश चौधरी २/४२) व ६ बाद २०६ (रोहित कारंजकर ८१, अवधूत दांडेकर ७१,प्रितम पाटील ४४, राहुल त्रिपाठी ४/४२) पराभूत वि. डेक्कन जिमखाना-३०३ (राहुल त्रिपाठी १२४, अमेय श्रीखंडे ६८, मंदार भंडारी ६५, तुषार श्रीवास्तव ५/५६, रोहन दामले ३/३०) व ३ बाद १६८ (अमेय श्रीखंडे नाबाद ८६, अक्षय जाधव ३७)
२.क्रिकेट मास्टर्स अकादमी-८ बाद २३४ (नौशाद शेख ११६, रोहित काकडे ६३, नंदन कामत ४९, पियुश साळवी ३/४४, अजय चव्हाण २/५८) व ८ बाद १२६ (अपूर्व दराडे ६७, अजय चव्हाण ३/३५, सागर उदयशी २/१३) पराभूत वि. पूना क्लब-६ बाद २५८ (अजिंक्य नाईक नाबाद १००, पराग मोरे ६५, नौशाद शेख २/४२, सुमित जंगम २/४८) व २ बाद १३४ (हृषीकेश सपकाळ ४०, अजिंक्य नाईक नाबाद ३०, अकीब शेख ३९)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा