नवी दिल्ली : जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी आयोजित कराव्या लागणाऱ्या निवड चाचणी संदर्भात १ ऑगस्टनंतर निर्णय घेण्यात येईल, असे गुरुवारी भारतीय ऑलिम्पिक संघटना नियुक्त हंगामी समितीच्या सदस्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जागतिक कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीवर अवलंबून असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. कुस्ती महासंघाच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची ३१ जुलै अखेरची तारीख आहे. त्यानंतर १ ऑगस्टला निवडणुकीचे एकूण चित्र स्पष्ट होईल. निवडणुकीत एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास निवडणूक अटळ असेल. पण, जर प्रत्येक पदासाठी एकच उमेदवार आल्यास निवडणूक बिनविरोध होईल आणि १ ऑगस्टलाच नव्या कार्यकारिणीकडे पदभार सोपवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत जागतिक कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीची वेळ आणि निकष नवी कार्यकारिणीच घेईल, असे हंगामी समितीमधील एक सदस्य ग्यानसिंग यांनी सांगितले.

अडचणी कायम

आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणी दिल्यानंतर यामधील विजेत्या मल्लांनी आमच्याही तंदुरुस्तीचा विचार करा अशी मागणी करताना जागतिक स्पर्धेसाठी निवड चाचणी २० ऑगस्टपर्यंत लांबविण्याची विनंती केली आहे. हंगामी समिती महासंघाच्या निवडणुकीची प्रतीक्षा करत बसल्यास अडचणी वाढणार आहेत.