श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी बांगलादेशची घसरगुंडी उडाली आणि त्यांचा डाव २४० धावांत आटोपला. पहिल्या कसोटीत बांगलादेशने सुरेख खेळ करत सामना अनिर्णीत राखला होता. रंगना हेराथने पाच विकेट्स घेत प्रथम गोलंदाजी करण्याचा श्रीलंकेचा निर्णय सार्थ ठरवला. मोमिनुल हकने सर्वाधिक ६४ धावा केल्या. नासिर हुसैनने ४८ धावा करत त्याला चांगली साथ दिली. नुवान कुलसेकराने ३ विकेट्स मिळवल्या.

Story img Loader