सध्या आयपीएलचे पंधरावे पर्व सुरु आहे. प्रत्येक संघाने जवळपास चार सामने खेळले आहेत. मात्र एकीकडे आयपीएलची धूम सुरु असताना दुसरीकडे चेन्नईचा दिग्गज वेगवान गोलंदाज दीपक चहरला दुखापतीने ग्रासलं आहे. त्याचा जुना पाठदुखीचा त्रास पुन्हा एकदा उद्भवल्यामुळे तो सध्या बंघळुरुमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादममीमध्ये उपचार घेत आहे. दरम्यान आता दीपक चहरला पाठीच्या दुखण्यातून बाहेर येण्यासाठी तब्बल चार महिन्यांचा कालावधी लागणार असून त्याच्या आयपीएलसोबतच टी-२० विश्वचषकामध्येही सहभागी होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा >>> MI in IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा संघ ‘प्ले ऑफ्स’च्या शर्यतीमधून बाहेर?; समजून घ्या Playoffs चं गणित
चेन्नई सुपर किंग्जने दीपक चहरला १४ कोटी रुपये देऊन खरेदी केलेलं आहे. त्याच्या गोलंदाजीपुढे दिग्गज फलंदाजांनी हात टेकलेले आहेत. त्यामुळे त्याचे चेन्नई तसेच भारतीय क्रिकेट संघासाठी मोठे महत्त्व आहे. मात्र चहर मागील काही दिवसांपासून बंगळुरुमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादममीमध्ये उपचार घेत आहे. आयपीएलच्या उत्तरार्धात तो चेन्नई संघात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याच्या पाठीच्या दुखण्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या दुखण्यातून बाहेर येण्यासाठी दीपकला चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे दीपक आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता मावळली आहे.
हेही वाचा >>> ४, ६, ६, ६, ६…, मुंबईच्या बेबी एबीची तुफानी फलंदाजी, पंजाबचे खेळाडू बघतच राहिले
त्याचबरोबर आगामी ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. मात्र यावेळीदेखील दीपक ठीक होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दीपकला पाठीच्या दुखण्यातून बाहेर येण्यासाठी चार महिने लागणार असल्यामुळे तो टी-२० विश्वचषकालाही मुकणार असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा >>> रोहित शर्माने रचला इतिहास, ‘हा’ विक्रम नोंदवणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू
दरम्यान, आयपीएलमध्ये दीपक चहरच्या चेन्नई संघाने आतापर्यंत पाच सामन्यांपैकी चार सामने गमावले असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरोधातील सामन्यात चेन्नईने आपला पहिला विजय नोंदवलेला आहे.