सध्या सर्वत्र लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे सर्वसामन्य लोकांप्रमाणे अनेक सेलिब्रिटीसुद्धा लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेट क्षेत्राबद्दल बोलायचे झाल्यास, नुकताच एका क्रिकेटपटूचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. अष्टपैलू भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरने गर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत लग्न केले. १ जून रोजी आग्र्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्याला दीपक आणि जयाचे कुटुंबिय, जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता. लग्न म्हटले की, सर्वात जास्त मजामस्ती वधू-वरांची भावंड करत असतात. दीपकचे लग्नही याला अपवाद नव्हते. त्याची बहीण मालती आणि चुलत भाऊ क्रिकेटपटू राहूल चहरने दीपकच्या लग्नाचा मनसोक्त आनंद लुटला. मालतीने तर आपल्या भावाला थेट सोशल मीडियावर हनीमून टीप्स दिल्या आहेत. सध्या मालतीचे एक ट्विट आणि इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीपक चहरची बहीण मालती चहर तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. पण, यावेळी ती तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आली आहे. मालतीने तिचा भाऊ दीपकच्या हनीमूनबद्दल एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने दीपकला एक मिश्किल सल्ला दिला आहे. मालतीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दीपक आणि जयासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोखाली तिने आपल्या भावासाठी खास सल्ला लिहिला आहे. ‘चला आता मुलगी आपली झाली, दोघांनाही वैवाहिक आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. दीपक चहर हनीमूनमध्ये स्वत:च्या पाठीची काळजी घे कारण पुढे तुला वर्ल्ड कपही खेळायचा आहे,’ अशी पोस्ट मालतीने केली आहे. याच फोटो आणि कॅप्शनसह तिने एक ट्विटही केले आहे. मालतीची ही बेधडक पोस्ट चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.

मालतीचा हा सल्ला वरकरणी मस्करी वाटत असला तरी त्यामागे एक खास कारणही आहे. दुखापतीमुळे दीपक चहर फेब्रुवारीपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. २० फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी ट्वेंटी सामन्यात तो जखमी झाला होता. यानंतर तो एनसीएमध्ये गेला होता पण तिथे त्याच्या पाठीला दुखापत झाली. या कारणास्तव तो नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेत एकही सामना खेळू शकला नाही.

दीपक चहर आणि जया भारद्वाज या जोडप्याचे नाते बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होते. आयपीएलच्या १४व्या हंगामादरम्यान दीपकने जयाला जाहीरपणे लग्नाची मागणी घातली होती. तेव्हापासून जगभरातील क्रिकेट चाहते या दोघांच्या लग्नाची वाट बघत होते.