बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचा दीपक कुमार व महाराष्ट्राची ललिता बाबर यांनी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनद्वारा आयोजित दहा किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत अनुक्रमे पुरुष व महिला गटात विजेतेपद संपादन केले. दीपककुमार याने १० किलोमीटरचे अंतर २८ मिनिटे ७ सेकंदात पार केले. पी.नागेंद्रराव व नवीन हुडा यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान घेतले. महिलांमध्ये ललिता बाबर हिने १० किलोमीटरचे अंतर ३५ मिनिटे ४० सेकंदात पार केले. स्वाती गाढवे व मोनिका आठरे यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. या शर्यतीसह विविध गटातील विजेत्या खेळाडूंचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी सायंकाळी सहा वाजता मॅरेथॉन भवन, मित्रमंडळ चौक येथे होणार आहे.

Story img Loader