India W vs Australia W 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (३० डिसेंबर) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. टीम इंडिया हा सामना तीन धावांनी हरला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. पहिला सामना त्यांनी सहा विकेट्सने जिंकला. आता उभय संघांमधील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २ जानेवारीला होणार आहे. त्यानंतर ५, ७ आणि ९ जानेवारीला तीन टी-२० सामने खेळवले जातील.भारतीय संघाची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने या सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. तिने सचिन तेंडुलकरच्या यादीत आपले नाव नोंदवले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेमध्ये ५ विकेट्स घेणारी दीप्ती पहिली महिला गोलंदाज ठरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लिचफिल्डने संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण पदार्पण करणाऱ्या श्रेयंका पाटीलने त्यांना ६३ धावांवर रोखले. यानंतर दीप्तीने अ‍ॅलिस पेरी, बेथ मुनी, तालिया मॅकग्रा, अ‍ॅनाबेल सदरलँड आणि जॉर्जिया वेअरहम या महत्त्वाच्या खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दीप्ती शर्माच्या पाच विकेट्समुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला केवळ २५८ धावांवर रोखले. दीप्ती शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्तम कामगिरीच्या बाबतीत माजी भारतीय महिला क्रिकेटपटू नुशीन अल कादिरचा विक्रम मोडला. कादिरने १० षटकांत ४१ धावा देत ४ विकेट्स घेतल्या तर दीप्तीने १० षटकांत केवळ ३८ धावा देत आपले पाच विकेट्स घेतल्या.

दीप्तीने सचिन तेंडुलकरच्या यादीत स्थान निर्माण केले

या शानदार गोलंदाजीने दीप्ती शर्मा सचिन तेंडुलकरच्या क्लबमध्ये सामील झाली आहे. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पाच विकेट्स घेणारी ती आठवी खेळाडू ठरली आहे. याआधी सचिन तेंडुलकर, मुरली कार्तिक, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, सचिन तेंडुलकरसह ७ दिग्गज खेळाडूंनी ही कामगिरी केली आहे. दीप्ती शर्माने केवळ या वन डेतच नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीतही तिने भूमिका चोख बजावली होती. त्यादरम्यान तिने शानदार फलंदाजी करत ७८ धावांची खेळी केली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका टीम इंडियाने गमावली

यास्तिका भाटियाच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. २६ चेंडूत १४ धावा करून ती एलबीडब्ल्यू बाद झाली. त्यानंतर स्मृती मानधना ३८ चेंडूत ३४ धावा करून बाद झाली. अ‍ॅलाना किंगच्या चेंडूवर मॅकग्राने झेल घेतला. भारताला तिसरा धक्का जेमिमाह रॉड्रिग्जच्या रूपाने बसला, तिने ५५ चेंडूत ४४ धावा केल्या. जॉर्जिया बेरेहॅमच्या चेंडूवर तिला फोबी लिचफिल्डने झेलबाद केले. हरमनप्रीत कौर १० चेंडूत ५ धावा करून बाद झाली. बेअरहॅमच्या चेंडूवर अ‍ॅलिसा हिलीने झेल घेतला.

रिचाचे शतक हुकली

४४व्या षटकात रिचा घोष बाद झाली, तिचे शतक हुकले. रिचाने ९६ धावा केल्या. तिने ११७ चेंडूंच्या खेळीत १३ चौकार मारले. रिचाला लिचफिल्डच्या हाती सदरलँडने झेलबाद केले. ती बाद झाल्यानंतर भारताची सामन्यावरची पकड कमकुवत झाली. अमनजोत कौर चार धावा करून, पूजा वस्त्राकर आठ धावा करून आणि हरलीन देओल एक धावा करून बाद झाली.

अ‍ॅलिस पेरीने अर्धशतक केले

ऑस्ट्रेलियन संघाला पहिला धक्का कर्णधार अ‍ॅलिसाच्या रूपाने बसला. २४ चेंडूत १३ धावा केल्यानंतर ती पूजा वस्त्राकरने बोल्ड झाली. तर अ‍ॅलिस पेरीला दीप्ती शर्माने श्रेयंका पाटीलच्या हाती झेलबाद केले. पेरी ४७ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५० धावा करून बाद झाला. बेथ मुनीच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला. १७ चेंडूत १० धावा करून ती बाद झाली. मुनीला दीप्तीने एलबीडब्ल्यू केले.

हेही वाचा: NZ vs BAN: न्यूझीलंडमध्ये टी-२०मालिका जिंकण्याचे बांगलादेशचे स्वप्न अधुरे, किवी संघाने विजय मिळवत वर्षाचा शेवट केला गोड

लिचफिल्डने उत्कृष्ट खेळी खेळली

फोबी लिचफिल्ड ९८ चेंडूत ६३ धावा करून बाद झाली. श्रेयंका पाटीलच्या चेंडूवर तिला रिचा घोषने झेलबाद केले. कांगारू संघाला पाचवा धक्का अ‍ॅशले गार्डनरच्या रूपाने बसला. तिने सहा चेंडूंवर दोन धावा केल्या. स्नेह राणाच्या चेंडूवर अमनजोत कौरने झेलबाद केले. ताहिला मॅकग्रा ३२ चेंडूत २४ धावा करून दीप्ती शर्माची शिकार ठरली. जॉर्जिया वेरेहॅम २२ धावा करून दीप्ती शर्माच्या चेंडूवर स्मृती मानधनाकरवी झेलबाद झाली. त्याचवेळी अ‍ॅनाबेल सदरलँड (२३) दीप्तीने तिच्याच चेंडूवर झेलबाद केले. अ‍ॅलाना किंग २८ आणि किम गर्थ ११ धावांवर नाबाद राहिले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepti sharma created history became the first female cricketer to do so against australia avw