Deepti Sharma take 6 wickets in IND W vs WI W 4th ODI : भारतीय महिला क्रिकेट संघाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली तिसरा वनडे सामना जिंकत वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिला. या सामन्यात दीप्ती शर्माच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा ५ विकेट्सनी धुवा उडवला. दीप्ती शर्माने या सामन्यात ६ विकेट्स घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावत इतिहास लिहिला आहे. आता दीप्ती एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५ विकेट्स घेणारी पहिली भारतीय महिला गोलंदाज ठरली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिच्या नावावर तिनदा पाच विकेट्स घेण्याचा विक्रम झाला आहे.

दीप्तीने झुलन-नीतू यांना टाकले मागे –

एवढेच नाही तर एकता बिश्तसह तिने झुलन गोस्वामी आणि नीतू डेव्हिडलाही मागे टाकले. या सर्वांनी एकदिवसीय कारकिर्दीत दोनदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. आतापर्यंत, दीप्तीने केवळ ९८ एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत आणि तिच्या नावावर १२३ विकेट्स आहेत. ज्यामध्ये २० धावांत ६ विकेट्स घेणे ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे. तिने शमन कॅम्पबेल, चिनेल हेन्री, जाडा जेम्स, आलिया ॲलेने, एफी फ्लेचर आणि अश्मिनी मुनिसर यांना बाद केले.

वेस्ट इंडिजचा संघ १६२ धावांवर झाला गारद –

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. संघाला ५० षटकांचा कोटाही खेळता आला नाही आणि केवळ ३८.५ षटकांत १६२ धावांवर गारद झाला. वेस्ट इंडिजला इतक्या छोट्या धावसंख्येवर रोखण्यात दीप्ती शर्माने सर्वात मोठी भूमिका बजावली. तिने १० षटकात केवळ ३१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – IND vs AUS : ‘तू अशी काय चूक केलीस की तुला सलामीवीर म्हणून काढलं…’, नॅथन लायनने केएल राहुलला डिवचल्याचा VIDEO व्हायरल

u

u

भारताने हा सामना अगदी सहज जिंकला –

यानंतर जेव्हा टीम इंडिया धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली, तेव्हा किती षटकात विजय मिळवणार याची उत्सुक्ता होती. मात्र, यावेळी मंधानाची बॅट चालली नाही आणि ती ४ धावा करून बाद झाली. हरलीन देवललाही एकच धाव करता आली. मात्र, कर्णधार हरमनप्रीत कौरने दुसरी सलामीवीर प्रतिका रावलसह संघाला विजयापर्यंत नेण्याचे काम केले. अखेरीस दीप्ती शर्माने आक्रमक फलंदाजी करत ४८ चेंडूत ३९ धावा केल्या. रिचा घोषने ११ चेंडूत २३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. भारताने केवळ २८.२ षटकांत पाच विकेट्स राखून सामना जिंकला.

Story img Loader