Deepti Sharma Run Out Controversy: भारतीय महिला क्रिकेट संघातील धडाकेबाज गोलंदाज दिप्ती शर्मा इंग्लंड विरुद्ध सामन्यात खऱ्या अर्थाने स्टार ठरली. तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात इंग्लंडची फलंदाज चार्ली डीनला धावबाद करण्यासाठी दिप्तीने अवलंबलेल्या मार्गावरून मागील दोन दिवसांपासून प्रचंड वाद सुरू आहेत. दिप्तीने मँकाडिंग या नियमानुसार कायदेशीर पद्धतीने चार्ली डीन बाद केलं असलं तरी असा मार्ग वापरणं शोभत नाही असे म्हणत जगभरातील अनेक क्रिकेटप्रेमी तसेच दिगज्जांनी दिप्तीवर टीका केली होती. तर भारतीय क्रिकेटपटू व चाहत्यांनी तिची पाठराखण केली होती. या सर्व वादात आता पहिल्यांदाच स्वतः दिप्ती शर्माने समोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे.
इंग्लंडची फलंदाज चार्ली डीन हिला वारंवार सूचना देऊनही तिने ऐकले नाही.. चार्ली डीन वारंवार क्रीज सोडत असल्याने आम्ही तिला पूर्वीच ताकीद दिली होती. त्यामुळे आम्ही जे काही केले ते नियमांनुसार योग्य होते. आम्ही पंचांनाही सांगितले होते. पण तरीही ती थांबली नाही परिणामी आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.”
दिप्ती शर्मा म्हणाली, “ती वारंवार क्रीज सोडत असल्याने ही आमची योजना होती. आम्ही तिला ताकीदही दिली होती. त्यामुळे आम्ही जे काही केले ते नियम आणि नियमांनुसार होते,” दीप्ती शर्मा म्हणाली. “आम्ही पंचांनाही सांगितले होते. पण तरीही ती करत होती, त्यामुळे आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.”
क्रिकेटच्या कायद्यांचे संरक्षक मेरीलेबोन क्रिकेट क्लबने याबाबत भूमिका स्पष्ट केली होती ‘अयोग्य खेळ’ श्रेणीतून ‘धाव बाद’ करणे काढून टाकण्यात आले होते ICC ने सुद्धा हा नियम स्वीकारला होता. नॉन-स्ट्रायकरला धावबाद करणे हा प्रकार, कलम 41 मधील अयोग्य खेळ प्रकारातून, कलम 38 धाव बाद करण्यामध्ये बदलण्याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केले होते.
Deepti Sharma Memes: लगान का बदला लिया! दिप्ती शर्मा वादात नेटकरी खुश, मीम्स पाहून व्हाल लोटपोट
झुलन गोस्वामीला जिंकून निरोप..
इंग्लंड विरुद्ध सामना हा झुलन गोस्वामीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. “प्रत्येक संघाला जिंकायचे असते. आम्हाला खेळ जिंकून तिला निरोप द्यायचा होता. एक संघ म्हणून आम्ही जे काही करू शकलो ते आम्ही केले,यापुढे मैदानावर झुलन दी ची उणीव भासेल असेही दिप्ती म्हणाली.
दिप्ती शर्माची पहिली प्रतिक्रिया…
दरम्यान, भारताने इतिहासात प्रथमच इंग्लंडचा इंग्लंडमध्ये पूणर्पणे पराभव केला. भारतीय ,हिला क्रिकेट संघाने इंग्लंड विरुद्ध मालिका ३-० अशा गुणांनी जिंकली होती. शेवटच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने सुरुवातीला फलंदाजी करत ४५.४ षटकांत १६९ धावा केल्या. ही धावसंख्या गाठण्याचा इंग्लंड महिला क्रिकेट संघाकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात होता. मात्र इंग्लंडचा संघ ४३.३ षटाकांतच बाद झाला.