Deepti Sharma Run Out Controversy: भारतीय महिला गोलंदाज दिप्ती शर्माने इंग्लंडची फंलदाज शार्लोट डीनला चलाखीने धावबाद केल्यावरून क्रिकेट जगतात एक वेगळाच वाद सुरु झाला आहे. अशा प्रकारे फलंदाजाला बाद करणे म्हणजे खेळभावनाविरोधी आहे, असे काही क्रिकेटप्रेमींनी म्हणत दिप्तीवर टीका केली आहे, अर्थात असं म्हणणाऱ्यांमध्ये बहुतांश क्रिकेटप्रेमी हे इंग्लंडचे रहिवासी असल्याचेही दिसतेय, तर या टीकाकारांना भारतीय चाहते सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. असेच एक ट्वीट चॅट सध्या समोर येत आहे ज्यात भारतीयांच्या टीकेला स्टुअर्ट ब्रॉड याने उत्तर दिलं आहे. यामध्ये स्टुअर्टने भारतीय फलंदाज विशेषतः सचिन तेंडुलकरही अशा प्रकारची खेळी करत असल्याचा आरोप ब्रॉडने केला आहे. काय आहे हे एकूण प्रकरण जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Deepti Sharma Memes: लगान का बदला लिया! दिप्ती शर्मा वादात नेटकरी खुश, मीम्स पाहून व्हाल लोटपोट

दिप्ती शर्मावरून वाद होत असताना अनेकजण मीम्स शेअर करत आहेत असाच एक मीम ट्विटर युजरने शेअर करून यात टिश्यूपेपरचा फोटो जोडून स्टुअर्ट ब्रॉडला टॅग केलं होतं ज्यावर स्टुअर्टने का असा प्रश्न केला. यावर ट्विटर युजरने युजरने डोळे पुसायला असा सल्ला देत पुन्हा चिमटा घेतला. स्टुअर्टने याआधी दिप्तीवर टीका करत अत्यंत वाईट पद्धतीने खेळ संपवला असे म्हणत ट्विट केले होते ज्यावर माजी क्रिकेटर डोड्डा गणेश यांनी उत्तर देत म्हंटले की,

“बॉल घसरवण्यासाठी निक करणे आणि काही झालेच नाही असे म्हणून उभे राहणे, खरोखर भयंकर आहे. रन-आउट करणे नाही. मला वाटतं, मॅच रेफ्री ब्रॉडला त्याच्या मुलाला क्रिकेटच्या नियमांबद्दल शिकवण्याची गरज आहे”

गणेश यांच्या ट्वीटला उत्तर देत पुन्हा ब्रॉडनेही पलटवार केला आहे. ब्रॉड म्हणतो की माझ्याकडे १००० उदाहरणे आहेत पण सचिन तेंडुलकर तेव्हा लकी होता नाहीतर निकिंग त्यानेही केले आहे. निकींगचा अर्थ बॉल बॅटच्या कडेला लागणे असा होतो यामुळे बॉल ची दिशा बदलते. यासोबत ब्रॉडने व्हिडीओही जोडला आहे.

दरम्यान, दिप्ती शर्माच्या बाजूनेही अनेक भारतीय खेळाडूंनी उत्तर दिले आहे. विरेंद्र सेहवागने दिप्तीची पाठराखण करत हरल्यावर रडणाऱ्या इंग्लिश चाहत्यांना सुनावले तर महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिनेही दिप्ती नियमातच खेळली असे स्पष्ट सांगितले आहे.