Deepti Sharma Run Out : भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना शनिवारी (२४ सप्टेंबर) लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला गेला, ज्यामध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने १६ धावांनी विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यातील विजयासह भारताने इतिहासात प्रथमच इंग्लंडचा इंग्लंडमध्ये पूणर्पणे पराभव केला. मात्र या सामन्याचा शेवट वादाने झाला आहे. भारतीय गोलंदाज दिप्ती शर्माने इंग्लंडची फंलदाज शार्लोट डीनला ज्या पद्धतीने धावबाद केले यावरून वादाला तोंड फुटले आहे.
दिप्ती शर्माने ४४ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अष्टपैलू खेळाडू शार्लोट डीनला धावबाद केले. दिप्तीने नॉन-स्ट्रायकरलाच शार्लोटला बाद केले, झालं असं की, बॉल डिलीव्हर होण्याआधीच शार्लोट निघाली तेव्हा दिप्तीने हुशारीने तिथेच तिला बाद केले, यानंतर शार्लोटला अक्षरशः रडू कोसळले हे पाहून दिप्तीच्या खेळावर अनेकांनी टीका केल्या आहेत, मात्र तिने हुशारीने व नियम पाळूनच शार्लोटला बाद केले हे स्पष्ट आहे. या सर्व वादावर आता विरेंद्र सेहवागने सुद्धा प्रतिक्रिया देत दिप्तीवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.
विरेंद्र सेहवागने ट्वीट करत म्हंटले की, इतके इंग्लिश (इंग्लंडचे रहिवासी) खेळाडू हरल्यावर रडतायत हे पाहून गंमत वाटते. या ट्वीटमध्ये सेहवागने दिप्तीच्या टीकाकारांचे काही स्क्रिनशॉटही जोडले आहेत.
दिप्ती शर्मा वादावर विरेंद्र सेहवाग म्हणतो..
दरम्यान, आयसीसीने अशा बाद करण्याच्या पद्धतीला परवानगी दिली आहे व काल शार्लोट बाद होणे हे नियमांनुसार उचित होते, या प्रकारे बाद करण्याला पूर्वी ‘मँकाडिंग’ म्हणून ओळखले जात होते परंतु आता नियम बदलल्यानंतर रन-आउट म्हणून वर्गीकृत केले गेले आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रित कौरने दिप्तीला पाठिंबा दिला आहे. दिप्तीने क्रिकेटमधील नियमानुसारच बळी घेतला, अशी प्रतिक्रिया कौरने दिली आहे. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने सुरुवातीला फलंदाजी करत ४५.४ षटकांत १६९ धावा केल्या. ही धावसंख्या गाठण्याचा इंग्लंड महिला क्रिकेट संघाकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात होता. मात्र इंग्लंडचा संघ ४३.३ षटाकांतच बाद झाला. इंग्लंडला अवघ्या १५३ धावा करता आल्या.