West Indies, World Cup 2023: वेस्ट इंडिजने याआधी दोन्ही एकदिवसीय विश्वचषकांवर नाव कोरले होते. तिसऱ्यामध्येही संघाने अंतिम फेरी गाठली. मात्र, आता २०२३च्या विश्वचषकात वेस्ट इंडिज खेळण्याची शक्यता कमी आहे. विश्वचषक २०२३च्या पात्रता फेरीतील गट सामन्यात झिम्बाब्वेकडून पराभव पत्करावा लागला, पाठोपाठ नेदरलँडकडून पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आता त्यांचे मुख्य विश्वचषक २०२३मध्ये खेळण्याचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. वेस्ट इंडिजने प्रथम खेळताना ३७४ धावा केल्या. नेदरलँड्सनेही ३७४ धावा केल्या. यानंतर सुपर ओव्हरमध्ये नेदरलँड्सने ३० धावा केल्या. वेस्ट इंडिजचा संघ दोन गडी गमावून केवळ ८ धावाच करू शकला.

वेस्ट इंडिजला विश्वचषक खेळणे कठीण का आहे?

हा सामना हरल्यानंतरही वेस्ट इंडिज सुपर-६ साठी पात्र ठरला आहे. मात्र संघ शून्य गुणांसह तेथे पोहोचला आहे. कारण त्याने झिम्बाब्वे किंवा नेदरलँड्समधील कोणावरही विजय मिळवला नाही, जो त्यांच्या गटातून सुपर-६ मध्ये पोहोचला. दुसरीकडे झिम्बाब्वेचे ४ गुण आहेत. दुसऱ्या गटातून श्रीलंका, स्कॉटलंड आणि ओमान पोहोचले आहेत. सुपर-६ मधील टॉप-२ संघ विश्वचषकासाठी पात्र ठरतील.

Maharashtra Kesari Wrestling Tournament Winner Prithviraj Mohol Reaction on shivraj rakshe
होय शिवराज राक्षेची एका बाजूची पाठ नक्कीच टेकली होती : पृथ्वीराज मोहोळ
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
Champions Trophy opening ceremony to be held in Lahore sports news
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे उद्घाटन तीन दिवस आधीच? सोहळा लाहोरला घेण्याची योजना
Australian Open 2025 Madison Keys stuns Aryna Sabalenka to win her first Grand Slam title
Australia Open 2025: मॅडिसन कीने सबालेन्काला नमवत जिंकलं पहिलं ग्रँडस्लॅम, विजयानंतर कोच असलेल्या नवऱ्याला मिठी मारत ढसाढसा रडली, पाहा VIDEO
Ranji Trophy 2025 Shubman Gill scored a century against Karnataka but Punjab lost the match by an innings and 207 runs
Ranji Trophy 2025 : शुबमन गिलची शतकी खेळी व्यर्थ! कर्नाटकाचा पंजाबवर मोठा विजय
Ranji Trophy 2025 Jammu Kashmir create history after beat Mumbai by 5 wickets in Elite group match
Ranji Trophy 2025 : जम्मू-काश्मीरने घडवला इतिहास! रोहित-यशस्वी रहाणे असतानाही मुंबईचा रणजीत दारूण पराभव
Ranji Trophy 2025 Yashasvi Jaiswal Shreyas Iyer Shivam Dube flop in Mumbai vs Jammu Kashmir match
Ranji Trophy 2025 : यशस्वी-श्रेयस आणि शिवम दुबे सलग दुसऱ्या डावात अपयशी, जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजांपुढे टेकले गुडघे

हेही वाचा: World Cup 2023: गेट सेट गो! वर्ल्डकप२०२३चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला

वेस्ट इंडिजने जरी तिघांना पराभूत केले तरी केवळ ६ गुण होतील. दुसरीकडे, झिम्बाब्वे एक सामना जिंकून ६ गुणांवर पोहोचेल. झिम्बाब्वेचा नेट रनरेटही चांगला आहे. यासह श्रीलंका आणि स्कॉटलंडमधील संघ ६ गुणांसह सुपर सिक्समध्ये पोहोचतील. जर झिम्बाब्वेने सुपर सिक्समधील दोन सामने जिंकले तर वेस्ट इंडिजला २०२३ मध्ये होणारा विश्वचषक खेळता येणार नाही.

‘लोगान व्हॅन बीक’ हा नेदरलँडच्या विजयाचा नायक ठरला

लोगान व्हॅन बीक नेदरलँड्सच्या विजयाचा नायक होता. सुपर ओव्हरमध्ये त्याने जेसन होल्डरविरुद्ध तीन षटकार आणि तीन चौकार मारून ३० धावा केल्या. येथूनच वेस्ट इंडिजचा पराभव निश्चित झाला. त्याने नेदरलँडसाठी सुपर ओव्हरमध्येही गोलंदाजी केली. व्हॅन बीकने गोलंदाजीत दोन्ही फलंदाजांना ८ धावांवर बाद केले. या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. सामन्याच्या शेवटी येताना त्याने १४ चेंडूत २८ धावांची खेळी केली.

हेही वाचा: World Cup Trophy: वर्ल्डकप ट्रॉफी पोहोचली थेट अंतराळात! पृथ्वीपासून तब्बल १.२० लाख फूट उंचीवर… , Video व्हायरल

काय घडलं मॅचमध्ये?

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ६ बाद ३७४ धावा केल्या. निकोलस पूरनने मधल्या फळीत ६५ चेंडूत १०४ धावा केल्या. त्याच्या खेळीत ९ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. ब्रँडन किंगने ७६ आणि जॉन्सन चार्ल्सने ५४ धावा केल्या. अखेरच्या पाच षटकात वेस्ट इंडीजने ४६ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँड्सने ९ गडी गमावून ३७४ धावा केल्या. तेजा निदामनुरूने ७६ चेंडूत १११ धावांची खेळी केली. स्कॉट एडवर्ड्सने ६७ धावा केल्या.

Story img Loader