लंडन : विम्बल्डन टेनिस स्पर्धेची गतविजेती चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोंड्रोउसोवाला महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. तर, अमेरिकेची जेसिका पेगुला व कोको गॉफ तसेच जपानची नाओमी ओसाका यांनी पुढच्या फेरीत आपले स्थान निश्चित केले. पुरुष एकेरीत इटलीच्या अग्रमानांकित यानिक सिन्नेर, नोव्हाक जोकोविच व अॅलेक्झांडर झ्वेरेवने दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले.

महिला एकेरीच्या सामन्यात सहावी मानांकित वोंड्रोउसोवा सहज विजय मिळवले असे दिसत होते. मात्र, स्पेनच्या युवा जेसिका मानेइरोने वोंड्रोउसोवाला स्थिरावू न देता ६-४, ६-२ असा विजय मिळवत धक्कादायक निकालाची नोंद केली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच जेसिकाने वोंड्रोउसोवाला दबावाखाली ठेवले व तिला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. ३० वर्षांपूर्वी गतविजेत्या स्टेफी ग्राफलाही अशाच पद्धतीने पहिल्या फेरीत पराभूत व्हावे लागले होते.

Rahul Dravid said Rohit Sharma stopped him from resigning after the ODI World Cup sport news
एकदिवसीय विश्वचषकानंतर रोहितने पद सोडण्यापासून रोखले – द्रविड
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Ravindra Jadeja Announces Retirement from T20 Cricket in Marathi
Team India : विराट-रोहितनंतर ‘या’ स्टार अष्टपैलू खेळाडूनेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला रामराम
Saurabh Netravalkar Straight Answer About Working After T20 World Cup
सुपर ८ फेरी गाठताच सौरभ नेत्रावळकरने कंपनीत केला कॉल; मॅचनंतर काम करण्याबाबत स्पष्टच म्हणाला, “मला कुणी त्रास..”
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान

अन्य सामन्यांत, पाचव्या मानांकित पेगुलाने अमेरिकेच्या अॅश्लेन क्रुएगरला ६-२, ६-० असे पराभूत केले. गॉफनेही कॅरोलिन डोलेहाइवर ६-१, ६-२ असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवला. तर, ओसाकाने संघर्षपूर्ण लढतीत फ्रान्सच्या डिआने पेरीला ६-१, १-६, ६-४ असे नमवले. चौथ्या मानांकित कझाकस्तानच्या एलिना रायबाकिनाने रोमानियाच्या एलिना गॅब्रिएला रुसवर ६-३, ६-१ असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवत पुढच्या फेरीत धडक मारली.

पुरुष एकेरीत सिन्नेरने जर्मनीच्या यानिक हाफमनला ६-३, ६-४, ३-६, ६-३ अशा फरकाने विजय नोंदवला. पहिले दोन सेट जिंकल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये हाफमनने खेळ उंचावत पुनरागमन केले. चौथ्या सेटमध्ये सिन्नेर चमक दाखवत विजय सुनिश्चित केला. तर, पुरुष एकेरीत जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या सर्बियाच्या दुसऱ्या मानांकित नोव्हाक जोकोविचने चेक प्रजासत्ताकच्या विट कोपरिवाला ६-१, ६-२, ६-२ अशा सरळ सेटमध्ये नमवले. तर, चौथ्या मानांकित जर्मनीच्या अॅलेक्झांडर झ्वेरेवने स्पेनच्या रॉबर्टो कारबालेस बाएनावर ६-२, ६-४, ६-२ असा विजय मिळवला. सातव्या मानांकित पोलंडच्या हबर्ट हुरकाझने मोल्डोवाच्या राडू एल्बोटला ५-७, ६-४, ६-३, ६-४ असे नमवत पुढची फेरी गाठली. भारताच्या सुमित नागलचे विम्बल्डन स्पर्धेतील आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले. सर्बियाच्या मिओमिर केचमानोविचने नागलला ६-२, ३-६, ६-३, ६-४ असे पराभूत केले.